गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी, पण घुसखोरी नको

सरकार संपूर्ण कर्जमाफीऐवजी जे गरजू आहेत त्यांनाच कर्जमाफीची लाभ मिळावा या बाजूनं असल्याचं दिसतंय आणि ते बरोबरही आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 15, 2017 07:15 PM IST

गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी, पण घुसखोरी नको

15 जून : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यायची की नोकरदार व्यापाऱ्यांना वगळायचं यावर राजकीय पक्षांमध्ये मतभेद असल्याचं दिसतंय. सरकार संपूर्ण कर्जमाफीऐवजी जे गरजू आहेत त्यांनाच कर्जमाफीची लाभ मिळावा या बाजूनं असल्याचं दिसतंय आणि ते बरोबरही आहे.

कर्जमाफीबद्दल कोणाचं काय आहे मत ?

भाजप- नोकरी धंदेवाल्यांना नको

शिवसेना-संपूर्ण कर्जमाफी

काँग्रेस- संपूर्ण कर्जमाफी

Loading...

राष्ट्रवादी- संपूर्ण कर्जमाफी

शेतकरी संघटना- नोकरी धंदेवाल्यांना नको

सरकार आणि शेतकरी संघटना मात्र संपूर्ण कर्जमाफीच्या बाजूनं नाहीत. जे नोकरी धंदा करतात, टॅक्स भरतात त्यांना कर्जमाफी नकोच अशी भूमिका शेतकरी संघटना, किसानपुत्र आंदोलन अशा काही संघटनांनी घेतलेली आहे. संपूर्ण कर्जमाफी म्हणजे नोकरदार आणि राजकीय नेत्यांनी सरकारी तिजोरीवर टाकलेला डल्ला असल्याचंही शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे. तीच बाजू पटवून देण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं होतोय.

ज्यांना गरज आहे त्यांनाच कर्जमाफी मिळायला पाहिजे. तसं केलं तर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रकमेतही वाढ करता येईल. आणि सरकारी तिजोरीवरही भार पडणार नाही. विरोधकांनीही ही बाजू लक्षात घ्यायला हवी असं जाणकार सांगतायत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 15, 2017 07:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...