वर्ध्यातही मोदी फॅक्टर,भाजपच्या रामदास तडस यांची सेकंड इनिंग

विदर्भातील वर्धा लोकसभा मतदारसंघातही मोदी लाटच पाहायला मिळाली.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 09:46 PM IST

वर्ध्यातही मोदी फॅक्टर,भाजपच्या रामदास तडस यांची सेकंड इनिंग

वर्धा, 23 मे: विदर्भातील वर्धा लोकसभा मतदारसंघातही मोदी लाटच पाहायला मिळाली. मोदी लाटेत भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस यांचा विजय झाला आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार चारुलता टोकस यांना पराभव पत्करावा लागला आहे. या निवडणुकीत इथे काँग्रेस आणि भाजपमध्येच थेट लढत होती. हाती आलेल्या निकालानुसार तडस यांना मतदारसंघात आपलं वर्चस्व कायम राखण्यात यश आलेलं आहे.वाचा : LIVE Lok Sabha Election Result 2019: काँग्रेसचे दिग्गज उमेदवार पिछाडीवर; राज्यात युती 42 जागांवर पुढे

मागच्या निवडणुकीत भाजपचा विजय

वर्ध्याचा राजकीय इतिहास पाहिला तर या जागेवर काँग्रेसचा दबदबा होता पण 1996 मध्ये या जागी भाजपने विजय मिळवला. 2004 आणि 2014 मध्येही इथे भाजपचाच विजय झाला होता. 1996 मध्ये भाजपचे विजय मुंडे इथून खासदार म्हणून निवडले गेले. त्यानंतर अनेक वर्षे इथे भाजप आणि काँग्रेसमध्येच लढत पाहायला मिळाली आहे. या लढतीत कधी काँग्रेसचा विजय झाला तर कधी भाजपचा.

वाचा :BREAKING LIVE Lok Sabha Election Result 2019: अधिकृत आकडेवारी सांगते भाजपला एकहाती सत्ता

1998 मध्ये या जागेवर काँग्रेसचे दत्ता मेघे यांचा विजय झाला होता. त्यानंतर 1999 मध्ये काँग्रेसकडून प्रभा राव, 2004 मध्ये भाजपचे सुरेश वाघमारे हे विजयी झाले होते. 2009 मध्ये काँग्रेसचे दत्ता मेघे पुन्हा एकदा संसदेत गेले. पण 2014 मध्ये ही जागा भाजपने खेचून आणली आणि रामदास तडस हेच खासदार झाले.लोकसभा निवडणूक 2014चा निकाल

रामदास तडस भाजप : 5,37,518 मतं

सागर मेघे, काँग्रेस : 3,21,735 मतं

रामदास तडस यांचा 2,15,783 मतांनी विजय

VIDEO : सेनेच्या वाघाला नमवणाऱ्या नवनीत राणांची पहिली UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 12:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...