ठाण्यात पुन्हा एकदा भगवा फडकला; राजन विचारे विक्रमी मतांनी विजयी

ठाण्यात पुन्हा एकदा भगवा फडकला; राजन विचारे विक्रमी मतांनी विजयी

ठाण्यात शिवसेनेच्या राजन विचारे यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला आहे.

  • Share this:

ठाणे, 23 मे : शिवसेनेचा गड अशी ओळख असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात राजन विचारे यांनी बाजी मारली आहे. ठाण्यात राजन विचारेंनी विक्रमी 4.50 लाख मतांनी विजय मिळवला आहे. ठाण्यावर अनेक वर्षं शिवसेनेचं वर्चस्व आहे. यावेळी शिवसेनेने विद्यमान खासदार राजन विचारे यांनाच उमेदवारी दिली. तर, राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी त्यांना आव्हान दिलं होतं. शिवसेनेचे दिवंगत खासदार प्रकाश परांजपे हे 1996 पासून ते 200 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये निवडून आले. त्यांच्या निधनानंतर 2008 ला लोकसभेची पोटनिवडणूक झाली. त्यावेळी त्यांचा मुलगा आनंद परांजपे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. या निवडणुकीत ते विजयीही झाले. त्यानंतर मात्र आनंद परांजपे शिवसेनेतून बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले.

2014च्या निवडणुकीत सेना विजयी

2009च्या निवडणुकीत संजीव नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांनी ठाणे जिंकलं. पण त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत मात्र राजन विचारे यांचा विजय झाला आणि ही जागा पुन्हा एकदा शिवसेनेकडे आली.

यावेळी 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आनंद परांपजे यांना उमेदवारी दिली आणि राजन विचारे विरुद्ध आनंद परांजपे अशी लढत झाली. ठाण्यात 29 एप्रिलला चौथ्या टप्प्यात मतदान झालं होतं.

2014च्या लोकसभा निवडणुकीत राजन विचारे यांना 5 लाख 95 हजार 364 मतं मिळाली. तर, संजीव नाईक यांना 3 लाख 14 हजार 65 मतं मिळाली होती. मनसेचे अभिजीत पानसे त्यावेळी तिसऱ्या स्थानावर होते.

सेनेचा गड सेनेकडे

ठाणे लोकसभा मतदारसंघात मीरा भाइंदर, ठाणे, बेलापूर या विधानसभा मतदारसंघावंर भाजपचं वर्चस्व आहे. ऐरोलीमध्ये राष्ट्रवादी तर पाचपाखाडी आणि ओवळा माजिवडा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत.


VIDEO : उद्धव ठाकरेंनी 'लाव रे तो व्हिडिओ'ची उडवली खिल्ली, 'मातोश्री'वर एकच हास्यकल्लोळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2019 08:39 PM IST

ताज्या बातम्या