News18 Lokmat

LIVE MURDER: लोक आपल्याला घाबरावे म्हणून भर चौकात मृतदेहावर केले वार

राजेंद्रचा खून केल्यानंतर आपले वर्चस्व दाखविण्यासाठी आरोपींनी मृतदेह ठेवलेली रिक्शा सीसीटीव्ही असलेल्या परिसरात नेला आणि मृतदेहावर पुन्हा शस्त्रांनी हल्ला केला.

News18 Lokmat | Updated On: Nov 9, 2018 06:43 PM IST

LIVE MURDER: लोक आपल्याला घाबरावे म्हणून भर चौकात मृतदेहावर केले वार

प्रवीण मुधोळकर, प्रतिनिधी

नागपुर, 09 नोव्हेंबर : नागपुरच्या नंदनवन परिसरातील खरबी परिसरात वर्चस्वाच्या लढाईतून दोन रिक्शा चालकांनी दुसऱ्या एका मालवाहू रिक्शा चालकाचा खून केल्याची घटना घडली आहे. राजेंद्र देशमुख असं या मृत ड्रायव्हरचे नाव असून आरोपींचे नावे गोलू ठाकरे आणि एजाज अनिस शेख असे आहे.


मृत राजेंद्र देशमुख हा खरबी परिसरामध्ये राहत होता. परिसरातील लहान-मोठे वाद तो सोडवायाचा. अशातच गेल्या आठवड्यात वाद सोडवण्यासाठी त्याने एकाला मारहाण केली होती.


Loading...

राजेंद्र्चे परिसरात वर्चस्व वाढत असल्याचे पाहत आरोपी गोलू ठाकरे आणि एजाज याने त्याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह आटो रिक्षामध्ये ठेऊन परिसरात आणला.


राजेंद्रचा खून केल्यानंतर आपले वर्चस्व दाखविण्यासाठी आरोपींनी मृतदेह ठेवलेली रिक्शा सीसीटीव्ही असलेल्या परिसरात नेला आणि मृतदेहावर पुन्हा शस्त्रांनी हल्ला केला.सीसीटीव्हीमध्ये मृत राजेंद्रला मारहाण करत असल्याचं रेकॉर्ड व्हावं, लोकांमध्ये दहशत निर्माण व्हावी म्हणून आरोपीने हे कृत्य केलं असल्याचं पोलिसांच्या प्राथिमक तपासात उघड  झालं आहे.


दरम्यान हा संपुर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला असून आरोपींचा शोध सुरू आहे. या संपूर्ण प्रकारामुळे नागपूर परिसरात भीतीचा व्हिडिओ व्हायरल.


VIDEO: ...आणि त्यांच्यात अशी जुंपली की सगळे बघतच राहिले!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 9, 2018 06:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...