परभणी निवडणूक निकाल 2019 LIVE : विद्यमान खासदार संजय जाधव आघाडीवर

लोकसभा निवडणुकीत परभणीमधून भाजपने विद्यमान खासदार संजय जाधव यांनाच रिंगणात उतरवलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने राजेश राव यांना उमेदवारी दिली. संजय जाधव यांनी 127,155 मतांनी आघाडी घेतली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 01:04 PM IST

परभणी निवडणूक निकाल 2019 LIVE : विद्यमान खासदार संजय जाधव आघाडीवर

परभणी, 23 मे : लोकसभा निवडणुकीत परभणीमधून भाजपने विद्यमान खासदार संजय जाधव यांनाच रिंगणात उतरवलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने राजेश राव यांना उमेदवारी दिली. संजय जाधव यांनी 127,155 मतांनी आघाडी घेतली आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघावर चार वेळा शिवसेनेचे खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे याही वेळी शिवसेना ही जागा राखणार का याची चर्चा आहे.

1998 मध्ये काँग्रेसचे सुरेश वरपुडकर इथे जिंकले होते. त्यानंतर मात्र शिवसेनेने मागे वळून पाहिलं नाही. 2014 पर्यंतच्या सगळ्या निवडणुकांमध्ये सेना विजयी झाली. त्यामुळे आत्ताही विजय मिळवण्याचा सेनेचा प्रयत्न आहे. पण त्याचबरोबर राष्ट्रवादीनेही इथे जोर लावला.

मागच्या निवडणुकीत संजय जाधव यांचा विजय

2014 च्या लोकसभा निवडणुकीत संजय जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय भांबळे यांचा पराभव केला. संजय जाधव यांना 5 लाख 78 हजार 455 मतं मिळाली तर विजय भांबळे यांना 4 लाख 51 हजार 300 मतं मिळाली.

Loading...

2009 च्या निवडणुकीत शिवसेनेचे गणेश राव यांनी राष्ट्रवादीचे सुरेश वरपुडकर यांचा पराभव केला.

परभणी लोकसभा मतदारसंघात जिंतूरमध्ये राष्ट्रवादी, परभणीमध्ये शिवसेना, गंगाखेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे. पाथरीमध्ये अपक्ष आमदार आहेत. परतूरमध्ये भाजप तर घनसावंगीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत.


VIDEO : सोलापुरात भीम आर्मीचा भाजपला इशारा, प्रकाश आंबेडकरांनी दिला 'हा' सल्ला


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 01:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...