S M L

रावेरमध्ये सासऱ्याचा करिश्मा ठरला निर्णायक, रक्षा खडसेंचा दणदणीत विजय

उत्तर महाराष्ट्रातल्या रावेर लोकसभा निवडणुकीत भाजपने रावेरच्या जागेवरील आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. रक्षा खडसे या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. live lok sabha election result 2019 raver raksha khadse Won

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 07:55 PM IST

रावेरमध्ये सासऱ्याचा करिश्मा ठरला निर्णायक, रक्षा खडसेंचा दणदणीत विजय

रावेर, 23 मे - उत्तर महाराष्ट्रातल्या रावेर लोकसभा निवडणुकीत भाजपने रावेरच्या जागेवरील आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. रक्षा खडसे या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्या विरुद्ध काँग्रेसने माजी खासदार उल्हास पाटील यांनी रिंगणात उतरवल होते.मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासून रक्षा खडसे आघाडीवर होत्या.रावेरची ही जागा राष्ट्रवादीने काँग्रेससाठी सोडली होती.रावेरच्या जागेवर भाजपचं चांगलं वर्चस्व आहे.

भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे या भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांची सून आहेत. त्यामुळे ही निवडणूक एकनाथ खडसेंसाठी प्रतिष्ठेची ठरली होती.

रावेर लोकसभा मतदार संघ अपडेट


रक्षा खडसे (भाजप)- 649885

उल्हास पाटील (कांग्रेस) - 318029

नितिन कांडेलकर (वंचित आघाडी) 87799

Loading...

ही आहेत रक्षा खडसेंच्या विजयाची कारणे...

- खडसेंचा करिश्मा

- एकनाथ खडसेंविषयी सहानुभूती

- प्रभावी प्रचार

- लेवा पाटील समाज बहुल भाग

- सक्षम विरोधक नाही

- मोदी फॅक्टर

- काँग्रेसनं ऐनवेळेस उमेदवार दिला

- उल्हास पाटील-महाआघाडी

ही आहेत उल्हास पाटील यांच्या पराभवाची कारणे..

-ऐनवेळेस मिळालेली उमेदवारी

- प्रचाराला मिळालेले कमी दिवस

- जनतेशी संपर्क नाही

- प्रभावी प्रचार नाही

- मोदी लाटेचा प्रभाव

- महत्त्वाचे प्रश्न प्रचारात आणण्यात अपयश

एकनाथ खडसेंसह गिरीश महाजन यांचीही प्रतिष्ठा पणाला

जळगावची जागा भाजपकडे खेचून आणणं गिरीश महाजनांसाठी तितकसं सोपं असणार नाही. कारण या मतदारसंघात भाजपला आपला उमेदवार बदलावा लागला. तसंच अंतर्गत वाद थेट हाणामारीपर्यंत गेल्याचंही पाहायला मिळालं. त्यामुळे जळगावमध्ये गिरीश महाजनांसमोर विजयासाठी मोठं आव्हान निर्माण झालं होते. या मतदारसंघात भाजपकडून उन्मेष पाटील मैदानात आहेत. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांनी दंड थोपटले आहेत.

2014 मध्ये रक्षा खडसेंचा विजय

2014 च्या लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसेंचा विजय झाला होता. रक्षा खडसेंना 6 लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मनीष जैन इथे 2 लाख 87 हजार 384 एवढीच मतं मिळवू शकले.

2009 च्या निवडणुकीत भाजपच्या हरिभाऊ जावळेंचा विजय झाला होता. सलग दोन निवडणुकांमध्ये भाजपचाच विजय झाल्यामुळे भाजप याही वेळी यश मिळवणार का याची चर्चा आहे.

भाजप - शिवसेनेचं वर्चस्व

रावेर लोकसभा मतदारसंघात चोपडा, रावेर, भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर, मलकापूर हे विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघांवर भाजप - शिवसेना युतीचं वर्चस्व आहे. याचा फायदा याही निवडणुकीत रक्षा खडसेंना मिळू शकेल.

तरुण खासदार होण्याचा मान

रक्षा खडसे यांनी 2010 मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. 2014 मध्ये त्या रावेरमधून खासदार म्हणून निवडून आल्या तेव्हा त्या फक्त 26 वर्षांच्या होत्या. त्यामुळे हीना गावित यांच्याप्रमाणेच लोकसभेच्या तरुण खासदार होण्याचा मान त्यांनी मिळवला. आता पुन्हा एकदा रक्षा खडसे विजय मिळवून हॅटट्रिक करतात का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 07:55 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close