नांदेड निवडणूक निकाल 2019 LIVE: अशोक चव्हाण यांचा पराभव, प्रतापपाटील चिखलीकर विजयी

नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भा जपचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी मुसंडी मारत अशोक चव्हान यांना मात दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 03:46 PM IST

नांदेड निवडणूक निकाल 2019 LIVE: अशोक चव्हाण यांचा पराभव, प्रतापपाटील चिखलीकर विजयी

नांदेड, 23 मे- नांदेडमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी मुसंडी मारत अशोक चव्हान यांना मात दिली आहे. वंचित बहुजन आघाडीचे यशपाल भिंगे यांच्यामुळे काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना ही लढत जड गेल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.


नांदेडची जागा ही माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा गड मानला जात होता. मात्र, शिवसेनेकडून प्रताप चिखलीकर यांच्या विजयाने काँग्रेसच्या गडाला सुरुंग लागला आहे. अशोक चव्हाण यांचे वडील आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण हे नांदेडमधून अनेक वेळा निवडून आले. शिवसेनेने यावेळी अशोक चव्हाण यांच्याविरुद्ध प्रताप चिखलीकर यांना उमेदवारी दिली. इथे समाजवादी पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असल्याने ही लढत काहिशी बहुरंगी ठरली होती. पण, मुख्य लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच होती.

ही आहेत अशोक चव्हाण यांच्या पराभवाची कारणे

- भाजपनं दिलेलं अशोक चव्हाणविरुद्ध मोदी असं स्वरूप

- ग्रामीण भागात भाजपला पाठिंबा

- खासदार, प्रदेशाध्यक्ष असल्यानं मतदारसंघात दिलेला कमी वेळ

- काँग्रेसचे स्थानिक आमदार आणि मुख्य पदाधिकाऱ्यांबद्दल असलेली नाराजी

- वंचित फॅक्टर महत्त्वाचा ठरला

- काँग्रेसची हक्काची वोटबँक वळली वंचितकडे

- दलित, मुस्लिमांची मतं वंचितकडे वळल्याचा अंदाज

ही आहेत प्रताप पाटील यांच्या विजयाची कारणे...

- अशोक चव्हाणांचे जिल्ह्यातील एकमेव कट्टर राजकीय विरोधक

- चव्हाणांच्या अन्य विरोधकांची साथ मिळाली

- काँग्रेसच्या तुलनेत बलाढ्य उमेदवार आहे

-पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडवणीस यांच्या झालेल्या सभा

-राष्ट्रवादीच्या नाराज गटानं दिलेली छुपी साथ

- भाजपनं लावलेली पूर्ण ताकद

राजकीय इतिहास

अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांनी 1980 मध्ये इथे वर्चस्व मिळवलं. त्यानंतर त्यांनी 1984 च्या निवडणुकीतही विजय मिळवला. 1986 मध्ये जेव्हा ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांनी नांदेडची जागा सोडली. 1987 मध्ये इथे पोटनिवडणूक झाली तेव्हा अशोक चव्हाण इथून निवडून आले.

लोकसभेच्या 2009 च्या निवडणुकीत बापूराव खतगावकर यांचा विजय झाला. बापूराव खतगावकर हे शंकरराव चव्हाण यांचे जावई आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असूनही अशोक चव्हाण यांनी नांदेडची जागा राखली. त्यावेळी काँग्रेसला नांदेड आणि कोल्हापूर या फक्त दोन जागा मिळाल्या.

सेनेकडून प्रताप चिखलीकर

प्रताप चिखलीकर यांनी शंकरराव चव्हाण यांच्याबरोबरच राजकीय प्रवासाला सुरुवात केली. पण नंतर मात्र अशोक चव्हाणांशी मतभेद झाल्यामुळे ते विलासराव देशमुख यांच्या गोटात गेले. 2012 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि 2014 मध्ये ते शिवसेनेत गेले.

मुस्लीम आणि दलित मतं निर्णायक

नांदेडमधला सचखंड गुरुव्दारा शीखधर्मियांचं महत्त्वाचं केंद्र आहे. इथे मराठा आणि दलित मतदारांची मतं निर्णायक आहेत. शिवाय काँग्रेसचे परंपरागत मतदार असलेल्या मुस्लीम मतदारांवरही इथली राजकीय गणितं अवलंबून आहेत.


VIDEO:आता 'लावा ना व्हिडिओ', मुनगंटीवारांचा राज ठाकरेंना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 03:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close