दिंडोरी लोकसभा निवडणूक 2019 Live: भाजपच्या डॉ. भारती पवार आघाडीवर

दिंडोरी मतदारसंघातही युती आणि आघाडीत 'काँटे की टक्कर' पाहायला मिळत आहे. भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार आघाडीवर आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे धनराज महाले हे पिछाडीवर आहेत. LIVE Lok Sabha Election Result 2019 Dindori Harishchadra Chavan vs Dr bharati Pawar

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 11:26 AM IST

दिंडोरी लोकसभा निवडणूक 2019 Live: भाजपच्या डॉ. भारती पवार आघाडीवर

नाशिक-दिंडोरी, 23 मे- दिंडोरी मतदारसंघातही युती आणि आघाडीत 'काँटे की टक्कर' पाहायला मिळत आहे. भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार आघाडीवर आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे धनराज महाले हे पिछाडीवर आहेत.

दिंडोरीमध्ये भाजपने यावेळी विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्याऐवजी डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे धनराज महाले यांनी निवडणूक लढवली. यावेळीची उत्तर महाराष्ट्रातील सर्वच लढती चुरशीच्या झाल्या आहेत. दिंडोरीची जागा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला आणि इथे सभाही घेतली.

मागच्या निवडणुकीत भाजपचा विजय

2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत इथे भाजपचा विजय झाला होता. गेल्या निवडणुकीत भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण इथून निवडून आले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर भारती पवार यांचा पराभव करत 5 लाख 42 हजार 784 मतं मिळवली.

मतदारसंघाच्या पुनरर्चनेआधी दिंडोरी लोकसभेची जागा मालेगावचा भाग होती. या लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये वेगवेगळी स्थिती असली तरी या मतदारसंघावर भाजपची चांगली पकड होती.

Loading...


VIDEO : अब की बार..., भाजपसाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 11:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...