धुळे लोकसभा निवडणूक 2019 Live: पुन्हा फुलले कमळ, डॉ. सुभाष भामरे विजयी

धुळे लोकसभा निवडणुकीचे अंतिम निकाल हाती आले आहेत. भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी 2 लाख 30 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 23, 2019 05:11 PM IST

धुळे लोकसभा निवडणूक 2019 Live: पुन्हा फुलले कमळ, डॉ. सुभाष भामरे विजयी

धुळे, 23 मे - धुळे लोकसभा निवडणुकीचे अंतिम निकाल हाती आले आहेत. भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी 2 लाख 30 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. डॉ. सुभाष भामरे यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. डॉ. सुभाष भामरे हे सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. त्यांच्याविरोधात काँग्रेसने कुणाल पाटील यांना उमेदवारी दिली होती. भाजपने  या निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रीक केलीआहे. 2009 आणि 2014 मध्येही धुऴ्यात कमळ फुलले होते. भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत होती.


यांच्यात झाली लढत..

- डॉ. सुभाष भामरे (भाजप)

- कुणाल पाटील (काँग्रेस)

Loading...

- अनिल गोटे - (लोकसंग्राम पक्ष)

ही आहेत डॉ. सुभाष भामरेंच्या विजयाची कारणे..

- मोदी फॅक्टर

- स्वच्छ आणि निष्कलंक चेहरा

- सर्जिकल स्ट्राईक

- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय

- मनमाड धुळे इंदोर रेल्वे आणि सुलवाडे जामफळ कनोली योजने साठी केंद्रातून निधी आणून केलेली सुरुवात.

- धुळे मतदारसंघातील विकासकामं

- मतदार संघात केलेला नियोजनबद्ध प्रचार.

- गिरीश महाजनांनी जातीनं घातलेलं लक्ष

- धुळे महापालिकेतला विजय

ही आहेत कुणाल पाटील यांच्या पराभवाची कारणे.. 

- काँग्रेसने ऐन वेळी उमेदवारी बदलली.

- वडील रोहिदास पाटील यांच्याऐवजी ऐनवेळेस उमेदवारी

- डॉ सुभाष भामरे यांच्याविरोधात सक्षम पर्याय नाही

- हिंदू राष्ट्राबद्दल जाहीर सभेत केलेले वादग्रस्त विधान

- काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी धुळे लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराकडे फिरवलेली पाठ.

भाजप-सेनेच्या तीन मंत्र्यांसमोर एकाकी

धुळ्यामध्ये 29 एप्रिलला मतदान

धुळ्यामध्ये चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे 52. 42 टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली. 2009 मध्ये इथे फक्त 42.54 टक्के मतदानाची नोंद झाली होती. मागच्या निवडणुकीत भाजप - शिवसेना युतीला मोदी लाटेचा फायदा झाला.

सुभाष भामरेंचा विजय

मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे सुभाष भामरे यांनी अमरीश पटेल यांचा 30 हजार मतांनी पराभव केला होता. सुभाष भामरेंना 5 लाख 29 हजार 450 मतं मिळाली तर अमरीश पटेल यांना 3 लाख 98 हजार 727 मतं मिळाली. धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे ग्रामीण, धुळे शहर, सिंदखेडा, मालेगाव सेंट्रल, मालेगाव आउटर आणि बागलाण हे विधानसभा मतदारसंघ येतात. या मतदारसंघात मतदारांचा कौल भाजपला आहे की काँग्रेसला हे 23 मे ला च कळू शकेल. उत्तर महाराष्ट्रात धुळे,रावेर,जळगाव,नंदुरबार अशा जागांवर भाजप - शिवसेना युतीची कामगिरी कशी होते याबदद्ल सगळ्यांनाच उत्सुकता आहे.


VIDEO : अब की बार..., भाजपसाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 23, 2019 05:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...