S M L
LIVE NOW

विधानपरिषदच्या 5 जागांचा निकाल जाहीर, 2 भाजप, 2 शिवसेना, 1 राष्ट्रवादी, काँग्रेसला धक्का

विधानपरिषदेच्या 6 पैकी 5 जागांसाठी आज मतमोजणी करण्यात येणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पण दरम्यान, उस्मानाबाद-लातूर-बीडची मतमोजणी पुढे ढकलली आहे.

Lokmat.news18.com | May 24, 2018, 1:55 PM IST
facebook Twitter google Linkedin
Last Updated May 24, 2018
auto-refresh

Highlights

24 मे : विधानपरिषदेच्या 6 पैकी 5 जागांसाठी आज मतमोजणी करण्यात येणार आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पण दरम्यान, उस्मानाबाद-लातूर-बीडची मतमोजणी पुढे ढकलली आहे. ही मतमोजणी अचानक झालेल्या कोर्ट केसमुळे लांबणीवर ढकलण्यात आली आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी पत्र पाठवूनच मतमोजणी आज होणार नसल्याचे कळवलं. स्थानिक स्वराज्य संस्थामधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सहा जागांसाठी 21 मे रोजी मतदान पार पडलं. या जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज होणार आहे. मात्र उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघातील मतमोजणी केंद्रीय निवडणूक आयोगानं पुढे ढकललीये. या ठिकाणी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे आज फक्त विधान परिषदेच्या पाच जागांचा निकाल लागणार आहे.   कोणत्या प्रमुख उमेदवारांमध्ये ही प्रतिष्टेची लढाई होतीय बघुयात          मतदारसंघ                                                                                                       उमेदवार   1) सिंधुदूर्ग-रत्नागिरी-रायगड                                                       1)अनिल तटकरे (एनसीपी) 2) राजीव साबळे (शिवसेना)   2) नाशिक                                                                                  1)नरेंद्र दराडे -शिवसेना   2)अॅड .शिवाजी सहाणे (राष्ट्रवादी)  3) परवेझ कोकणी (अपक्ष)   3) अमरावती                                                                              1)प्रविण पोटे-पाटील (भाजप)  2) अनिल मधोगरिया (काँग्रेस)   4) परभणी-हिंगोली                                                                    1) सुरेश देशमुख (कांग्रेस)   2) विप्लव बाजोरिया (शिवसेना)   5) वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली                                                         1) इंद्रकुमार सराफ(कांग्रेस)  2) रामदास आंबटकर (भाजप )   विधानपरिषद मतदानाची टक्केवारी  नाशिक- 100टक्के​ सिंधुदूर्ग - 99 टक्के मतदान अमरावती - 100 टक्के वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर - 99.35 (308 पैकी 306) परभणी-हिंगोली - 99.60 (501 पैकी 499)   विधान परिषदेचा आखाडा  नाशिक - शिवसेना पहिल्या क्रमांकावर असला तरी त्यांना भाजपची साथ महत्वाची - पालघर लोकसभा निवडणुकीतील सेनेच्या खेळीनं नाराज भाजपची राष्ट्रवादीला साथ   कोकण - राष्ट्रवादीच्या तटकरेंना राणेंची साथ - भाजप आणि शेकापनं राष्ट्रवादीला मदत केल्यानं शिवसेनेची अडचण   परभणी - परभणीत काँग्रेसला निवडणूक सुकर होण्याची चिन्ह     संबंधित बातम्या

विधान परिषदेसाठी अभद्र युतीचं पेव, क्रॉस वोटिंगचंही ग्रहण!

नाशिकमध्ये सेनेला शह देण्यासाठी भाजपचा राष्ट्रवादीला पाठिंबा !

विधान परिषदेच्या 6 जागांसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

विधानपरिषद निवडणूकीत लातूर राष्ट्रवादीला तर परभणी काँग्रेसला

'तुझ्या वाचून करमेना...' भाजप-शिवसेना एकत्र लढवणार विधानपरिषद निवडणूक

युतीची वाट न बघता नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर

विधान परिषदेच्या ६ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक

 
Load More

Live TV

News18 Lokmat
close