छुप्या पद्धतीने दारू विक्री सुरूच,औरंगाबादेत 9 लाखांची दारू जप्त

छुप्या पद्धतीने दारू विक्री सुरूच,औरंगाबादेत 9 लाखांची दारू जप्त

हाय वे वरील दारूबंदीनंतर ही पहिलीच मोठी कारवाई आहे.

  • Share this:

08 एप्रिल : सुप्रीम कोर्टाने हायवे लगत दारू विक्री बंद केल्यानंतरही राज्यभरात छुप्या पद्धतीने दारू विक्री सुरूच आहे. औरंगाबादेत उत्पादन शुल्क विभागाने दारूची तस्करी करणा-या पकडलं आहे. हाय वे वरील दारूबंदीनंतर ही पहिलीच मोठी कारवाई आहे.

अरूणाचल प्रदेशात विकण्याची परवानगी असलेली दारू मराठवाड्यात विकण्यासाठी आलेली असतांनाच उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली आहे. कारवाईत मध्ये 9 लाखाची दारू आणि एका आरोपीला अटक केली आहे इतर राज्यातील दारू ड्युटी चुकवून राज्यात विकणारी टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे..

 शिरसाट फाटा इथं दारूसाठा जप्त

मुंबई अहमदाबाद महामार्गावर शिरसाट फाटा येथे विरार पोलिसांनी  एका गोडाऊनवर धाड टाकून दारूसाठा जप्त केलाय. याप्रकरणी हॉटेल व्यवस्थापकालाही पोलिसांनी अटक केलीय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हायवे पासून 500 मीटर अंतरावर असलेल्या दारू विक्रीवर बंदी घातल्यानंतर छुप्या मार्गाने दारू विक्री सुरू झालीय.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शिरसाट फाटा येथील शिवानी हॉटेलच्या बाजूला गोडाऊनमध्ये छापा टाकून विविध प्रकारचे दारूचे बॉक्स जप्त केलेत. या प्रकरणी कुमार गौरव  नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पाथर्डीत  ९४ हजारांची दारू जप्त

अहमदनगरमधील पाथर्डी शहरात कैलास परमिट रूमवर पोलिसांनी कारवाई केलीय. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महामार्गापासून ५०० मीटरच्या आत असलेल्या बिअर बारवर पोलिसांनी कारवाई सुरू केलीय. मात्र या हॉटेलमध्ये अद्यापही दारूची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी सापळा रचून या हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत ९४ हजार २२४ रुपयांची दारू जप्त करण्यात आलीय. या प्रकरणी  एका आरोपीला अटक करण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 9, 2017 12:00 AM IST

ताज्या बातम्या