दारूबंदी असलेल्या चंद्रपूरात दारुची तस्करी, पोलिस कॉन्स्टेबलला अटक

दारूबंदी असलेल्या चंद्रपूरात दारुची तस्करी, पोलिस कॉन्स्टेबलला अटक

दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी होत असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे कुंपनच शेत खात असल्याचा प्रकार समोर आला आहे. दारूच्या तस्करीत एका पोलिस कॉन्स्टेबलसह दोघांना अटक करण्यात आली आहे.

  • Share this:

चंद्रपूर, 9 जून- दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी होत असल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे कुंपनच शेत खात असल्याचा प्रकार समोर आला आहे. दारूच्या तस्करीत एका पोलिस कॉन्स्टेबलसह दोघांना अटक करण्यात आली आहे. रविवारी सकाळी नंदोरी टोलनाक्यावर एसक्रॉस गाडीतून ( MH31 EU 4873) विदेशी दारूच्या 8 पेट्या पकडण्यात आल्या. या दारूचे बाजार मुल्य 9 लाख 35 हजार 200 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सचीन विनायक हांडे (वय-33) बक्कल नंबर 6659 असे अटक करण्यात आलेल्या आरोपाचे नाव आहे. आरोपी सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये शिपाई पदावर कार्यरत आहे. प्रणव हेमंत म्हैसकर ( वय-23, रा. माणकापूर, नागपूर) असे दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. प्रणव हा IAS अधिकाऱ्याचा जवळचा नातेवाईक आहे.

मद्याच्या रिफिलिंगचा गोरखधंदा उघड

दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अंबरनाथमध्ये छापेमारी करून मद्याच्या रिफिलिंगचा गोरखधंदा उघड केला आहे. पथकाने तब्बल 30 लाख रुपयांचे गोवा बनावटीचे विदेशी मद्य जप्त केले आहे. यात मद्याने भरलेल्या 5 हजार 700 बाटल्या आणि वेगवेगळ्या ब्रँडेड कंपन्यांचे 50 हजार झाकणांचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे अंबरनाथच्या बोहणोली गावातील शेतघरात सुरू होता.

मिळालेली माहिती अशी की, अंबरनाथच्या बोहणोली येथे एका शेतघरात हा गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या रिफिलिंगचा गोरखधंदा सुरू होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई पथकाने ही रविवारी पहाटेच्या सुमारास छापेमारी केली. यात मद्याने भरलेल्या जवळपास 5 हजार बाटल्या आणि वेगवेगळ्या ब्रँडचे 50 हजार झाकणं जप्त करण्यात आली आहेत. राज्य उत्पादन शुल्क मुंबई विभागाचे निरीक्षण दीपक परब, दुय्यम निरीक्षक प्रमोद कांबळे, दिलीप काळेल, राहुल पवार, बाळासाहेब गलांडे, संजय वाडेकर, दीपक कळंबे, विक्रम कुंभार या भरारी पथकाने ही छापेमारी केली.

Loading...

गोवा राज्यातून अवघ्या 90 रुपयांत हलक्या प्रतीची दारू आणून ही दारू बारमधील रिकाम्या झालेल्या रॉयल स्टॅग, एमपीरियल ब्लु, मॅगडॉल, डीएसपी ब्लॅक ब्रँडेड मद्याच्या बाटल्यांमध्ये भरून त्याचे रिफिलिंग करण्याचे काम इथे सुरू होते. हे रिफिलिंग झाल्यावर 90 ही बाटली 600 रुपयांना पुन्हा बार आणि इतर ठिकाणी विकण्याचे या रॅकेटच्या माध्यमातून सुरू होते. सध्या या शेतघराचा मालक जगदीश लालचंद पाटील याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो फरार आहे. हलक्या प्रतीचे मद्य सेवन केल्याने अनेकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याने यामागे असलेल्या रॅकेटला लवकरात लवकर शोधून काढू, असे मुंबई उत्पादन शुक्ल विभागाचे निरीक्षक दीपक परब यांनी स्पष्ट केले आहे.


VIDEO: खासदार झाल्यानंतर अमोल कोल्हेंचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 9, 2019 04:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...