हायवेवरच्या बार बंदीवर महापालिकेचा असाही उतारा...

हायवेवरच्या बार बंदीवर महापालिकेचा असाही उतारा...

नांदेड शहरातून जाणारे महामार्ग शहरात समाविष्ट करण्याचा ठराव मंजूर, हायवेलगतचे बार बंद करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला बगल देण्याचा जोरदार प्रयत्न..

  • Share this:

मुजीब शेख,  नांदेड

02 एप्रिल : महापालिका हद्दींमधून जाणारे हायवे आपल्या अखत्यारित घेण्यासाठी राज्यातल्या अनेक महापालिकांनी कंबर कसली आहे. महापालिकांना आलेलं हे प्रेम विकासाचं नसून बार आणि दारु दुकानांसाठी असल्याचं समोर आलं आहे.

राज्यातल्या अनेक महापालिका आणि नगरपालिकांना त्यांच्या हद्दीतून जाणारे हायवे स्वतःच्या अखत्यारित करण्याची घाई झाली आहे. काही महापालिकांनी तर हायवे ताब्यात घेण्याचे ठरावही आणलं. आता तुम्ही म्हणाल की अंतर्गत रस्त्यांच्या नावानं बोंब असलेल्या महापालिकांना एकदम हायवेंचा उमाळा का आला. हे प्रेम रस्त्यांसाठी नव्हे तर रस्त्यांच्या शेजारी असलेल्या बार आणि दारुच्या दुकानांसाठी आहे. सुप्रीम कोर्टानं हायवेशेजारील दारुच्या दुकानांवर सरसकट बंदी आणली आहे. त्यामुळं बारवाल्यांच्या लॉबीला वाचवण्यासाठी महापालिकेतल्या कारभाऱ्यांनी कंबर कसली आहे. याबाबत विचारलं तर उत्तरं ही अशी मिळतात.

हायवेशेजारचे बार वाचवण्याचा हा खटाटोप आहे हे न समजण्याएवढी जनता खुळी नाही. बार वाचवण्यासाठी जी तत्परता लोकप्रतिनिधींनी दाखवली तिच विकासकामं करताना दाखवावी हीच अपेक्षा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 2, 2017 06:32 PM IST

ताज्या बातम्या