लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी म्हणून समाजाचा महामोर्चा

लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी म्हणून समाजाचा महामोर्चा

लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी आज सांगलीमध्ये लिंगायत समाजाचा महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लिंगायत बांधव लाखोंच्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रसंत जगद्गुरू डॉ. शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज यांनी केले.

  • Share this:

सांगली, 03 डिसेंबर:   लिंगायत समाजाला धर्माला संविधानिक मान्यता देण्यात यावी, या सह विविध मागण्यांसाठी मोर्चांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रसंत जगद्गुरू डॉ. शिवलिंग शिवाचार्य अहमदपुरकर महाराज यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला आहे.

लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता देण्यात यावी यासह विविध मागण्यासाठी आज सांगलीमध्ये लिंगायत समाजाचा महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लिंगायत बांधव लाखोंच्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रसंत जगद्गुरू डॉ. शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज यांनी केले. देशभरातील विविध पीठांचे जगद्गुरू यावेळी उपस्थित होते. नांदेड, लातूर, बेळगाव, हुबळीनंतर लिंगायत समाजाचा पश्चिम महाराष्ट्रातील पहिला मोर्चा आज सांगलीत काढण्यात आला होता

देशाला स्वातंत्र मिळण्याच्या आगोदर लिंगायत हा स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता होती. मात्र स्वातंत्र्यानंतर लिंगायत समाजाचा हिंदू धर्मामध्ये समावेश करण्यात आला. तेव्हा पासून पुन्हा लिंगायत धर्म म्हणून संविधानिक मान्यता देण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. या मागणी साठी लिंगायत बांधव पुन्हा आक्रमक झाले आहेत.

या मागणी बरोबरच लिंगायत धर्मियांना धार्मिक अल्पसंख्यांक वर्गा मध्ये समाविष्ठ करावे, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या सह अनेक मागण्यासाठी लिंगायत समाजाच्या वतीने महाराष्ट्र आणि कर्नाटकात महामोर्चांच आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान लिंगायत हा स्वतंत्र धर्म असल्याचे कागदोपत्री पुरावे, आमच्या कडे आहेत, ते पुरावे महाराष्ट्र सरकारला दिले जातील अशी माहिती, कर्नाटकाचे जलसंपदा मंत्री एन बी पाटील यांनी दिली आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2017 07:04 PM IST

ताज्या बातम्या