पॉवरफुल्ल पेक्षा हेल्पफुल नेता बनायला आवडेल,पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला

पॉवरफुल्ल पेक्षा हेल्पफुल नेता बनायला आवडेल,पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला

भाजप विरुद्ध राष्ट्रवादी किंवा आघाडी विरुद्ध आघाडी अशी निवडणूक व्हावी अशी आमची इच्छा आहे अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.

  • Share this:

बीड, 21 एप्रिल : मला पॉवरफुल्ल नेता बनण्यापेक्षा हेल्पफुल नेता बनायला आवडेल अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता टोला लगावलाय.

कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या भावा-बहिणीमधलं वाग्युद्ध राज्याला नवीन नाही.

विधान परिषदेच्या दोन जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय. त्यात बीड-लातूर- उस्मानाबाद मतदारसंघात होणारी निवडणुक पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी अतीतटीची ठरणार आहे.

आताच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्षांसोबत बैठक घेऊन जागांचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती पंकजा मुंडेंनी दिली. तसंच प्रत्येक वेळा मुंडे विरुद्ध मुंडे अशी निवडणुकीची चर्चा होते. हे नेहमीचं आहे. पण भाजप विरुद्ध राष्ट्रवादी किंवा आघाडी विरुद्ध आघाडी अशी निवडणूक व्हावी अशी आमची इच्छा आहे अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.

आता निवडणुकीच्या राजकीय लढाईत कोण कोणाला शह देतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2018 08:35 PM IST

ताज्या बातम्या