आणखी किती धर्मा पाटील? ; मंत्रालयाच्या दारात पुन्हा एक शेतकरी

धर्मा पाटील यांचं प्रकरण कुठे थांबत नाही तोच मंत्रालयाच्या दारात अजून एक धर्मा पाटील उभे आहेत. त्यांचं नाव आहे राजाराम गायकवाड.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 2, 2018 11:34 AM IST

आणखी किती धर्मा पाटील? ; मंत्रालयाच्या दारात पुन्हा एक शेतकरी

02 फेब्रुवारी : धर्मा पाटील यांचं प्रकरण कुठे थांबत नाही तोच मंत्रालयाच्या दारात अजून एक धर्मा पाटील उभे आहेत. त्यांचं नाव आहे राजाराम गायकवाड. पण आम्ही यांना धर्मा पाटील यासाठी म्हटलंय कारण यांची आणि धर्मा पाटील यांची व्यथा एकच आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सरमकुंडी गावातल्या राजाराम गायकवाड यांची हायवेत अर्धा एकर आणि राहतं घरही गेलं आहे. दलालांनी त्यांच्यावर दमदाटी सुरू केलीय. तर सरकारी यंत्रणा राजाराम आजोबांना फक्त नाडण्यात धन्यता मानतेय. त्यामुळं ते अखेर न्याय मिळवण्यासाठी मंत्रालयाच्या दारात आलेत.

मंत्रालयात कुणी म्हणालं मुख्यमंत्र्यांना अर्ज द्या...कुणी सांगितलं विरोधी पक्षनेत्यांच्या बंगल्यावर जा. राजाराम यांनी हे सगळं त्यांनी कारण त्यांना फक्त न्याय हवा आहे.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रशासकीय यंत्रणेला फोन केला. पण या फोनवर राजाराम यांचं काम होईल की नाही याबाबत शंका आहे. धर्मा पाटील यांच्यासारखे अनेक पीडित शेतकरी महाराष्ट्रात आहेत ज्यांची फसवणूक झाली आहे. मंत्रालयाच्या दारात येऊन विष प्यायल्यावरच त्यांना न्याय मिळेल का असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 2, 2018 11:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...