सदाभाऊ, वाद आणि हकालपट्टी

सदाभाऊ, वाद आणि हकालपट्टी

थोडक्यात सदाभाऊंचा इतिहास या वादाची पार्श्वभूमी आणि हकालपट्टीची कारणं जाणून घेऊ या.

  • Share this:

07 ऑगस्ट: स्वाभिमानी संघटनेतून सदाभाऊ खोतांची आज हकालपट्टी करण्यात आली. थोडक्यात सदाभाऊंचा इतिहास या वादाची पार्श्वभूमी  आणि हकालपट्टीची कारणं जाणून घेऊ या.

-राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत हे स्वाभिमानी संघटनेचे सर्वोच्च नेते आहेत.

-दोन्ही नेते शरद जोशींच्या शेतकरी संघटनेत तयार झाले.

-शरद जोशींसोबत मतभेद झाल्यानंतर शेट्टी बाहेर पडले, खोत शेट्टींसोबत राहिले

-सदाभाऊ खोतांनी माढ्याच्या लोकसभेची निवडणूकही लढवली पण त्यांचा पराभव झाला.

Loading...

-माढा लोकसभा निवडणुकीत खोतांनी लोकवर्गणीत अफरातफर केल्याचा आरोप करण्यात आला.

-धूळ्याच्या एका दूध सोसायटीत भ्रष्टाचाराच्या आरोपात एक दिवसची जेलची हवाहा खावी लागली

-सदाभाऊ खोत हे सध्या भाजपच्या तिकिटावर विधान परिषद सदस्य आहेत

-भाजपचा उमेदवार म्हणून आमदार होण्यास शेट्टींनी विरोध केला

-खोत हे एनडीएच्या म्हणजेच स्वाभिमानीच्या कोट्यातून आमदार झाले आहेत

-मंत्री झाल्यानंतर खोतांनी शेट्टींना दूर सारत मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधल्याचा आरोप करण्यात आला.

-स्वाभिमानीच्या पदयात्रेतही सहभागी होणं सदाभाऊ खोत यांनी टाळलं होतं

-शेतकरी संपात खोतांनी फूट पाडल्याचा आरोप करण्यात आला तर शेट्टी संपासोबत राहिले.

-सदाभाऊ खोतांच्याविरोधात चौकशी समिती नेमली गेली. या समितीनं खोतांची हकालपट्टी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2017 07:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...