S M L

माहूर गडावर रेणुका मातेच्या दर्शनासाठी बिबट्याने लावली हजेरी, केली कुत्र्याची शिकार

रेणुका मातेच्या दर्शनासाठी चक्क एक बिबट्या मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हजेरी लावून एका कुत्र्याला आपली शिकार केरून गेला.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 19, 2018 07:51 AM IST

माहूर गडावर रेणुका मातेच्या दर्शनासाठी बिबट्याने लावली हजेरी, केली कुत्र्याची शिकार

19 एप्रिल : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरील रेणुका मातेच्या दर्शनासाठी चक्क एक बिबट्या मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास हजेरी लावून एका कुत्र्याला आपली शिकार केरून गेला. ही घटना मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने माहूर परिसरात बिबट्याची दहशत पसरून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

माहूर गडावरील रेणुका मातेच्या मंदिराच्या अवती भोवती जंगल व्याप्त परिसर आहे. सध्या जंगलात पाण्याची प्रचंड समस्या असल्याने जंगली जनावरं पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. मंगळवारी मध्यरात्री रेणुकामाता मंदिरकडे जाणाऱ्या नगर खाण्याच्या पायरीवर बिबट्याने हजेरी लावत पायरीवर बसून असलेल्या दोन कुत्र्या पैकी एकाला आपलं शिकार बनवलं आहे.

पाण्याच्या शोधातच हा वाघ लोक वस्तीत येऊन या वाघाने कुत्र्याला आपल्या जबड्यात पकडून घेऊन नेलं. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पहायला मिळतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 19, 2018 07:51 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close