जळगावातल्या 'त्या' नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत घेतलेत 6 बळी

जळगावातल्या 'त्या' नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत घेतलेत 6 बळी

नरभक्षक बिबट्यानं सहावा बळी घेतलाय. काल जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी याच बिबट्याच्या शोध मोहिमेत भाग घेतला होता.

  • Share this:

जळगाव, 28 नोव्हेंबर: जळगावच्या वरखेड खुर्द गावात नरभक्षक बिबट्यानं सहावा बळी घेतलाय. काल  जलसंपदा मंत्री  गिरीश महाजन यांनी याच बिबट्याच्या शोध मोहिमेत भाग घेतला होता. त्याला मारायला पिस्तूलही बाहेर काढले होते. तसंच या घटनेनंतर प्रचंड खळबळ माजली होती.

वनमंत्र्यांनी बिबट्याला पकडायचे  आदेश देऊन काही तास होताच वरखेड खुर्द इथं झोपडीत झोपलेल्या वृद्धेवर बिबट्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात वृद्धेचा बळी गेला आहे. बिबट्याच्या हल्ल्यातील मृतांची संख्या आता सहा झालीय. यामुळे परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालंय.

आतापर्यंत शेत-शिवारात जनावरांचा नागरीकांवर हल्ला चढवणार नरभक्षक बिबट्याने चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे खुर्द गावातील झोपडीवजा घरात राहणाऱ्या यमुनाबाई दला तिरमली यांच्यावर हल्ला चढवलाय. यमुनाबाई तिघा मुलांसह झोपल्या असतानाच नरभक्षक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला.

त्यामुळे आता पोलिसांना या बिबट्याला पकडण्यात यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2017 08:18 PM IST

ताज्या बातम्या