S M L

'भाजपमध्ये नेते विकत घेतले जातात', गजानन कीर्तिकरांचा आरोप

भाजपामध्ये इतर पक्षातील मोठे मोठे जनाधार असलेले नेते विकत घेतले जातात, असा गंभीर आरोपखासदार गजानन कीर्तिकरांनी भाजपवर केला आहे.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 16, 2018 07:44 AM IST

'भाजपमध्ये नेते विकत घेतले जातात', गजानन कीर्तिकरांचा आरोप

16 एप्रिल : शिवसेना नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपामध्ये इतर पक्षातील मोठे मोठे जनाधार असलेले नेते विकत घेतले जातात, असा गंभीर आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील तर पैशांचा पाऊस पडतात. त्यामुळे त्यांची ताकद दिसते, पण ती ताकद तात्पुरती असते, आणि आत्ता तर मोदींची घसरण सुरू आहे. त्यामुळे खरेदी केलेले नेते परत जाणार आहेत, असा टोलाही खासदार गजानन कीर्तिकर यांनी लगावला आहे. सांगली येथे शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यानंतर कीर्तिकर हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, या शिवसेनेच्या मेळाव्यात गजानन कीर्तिकर यांनी सांगलीच्या जिल्हाप्रमुखांनाही झापले. उपस्थितांमध्ये तालुका उपप्रमुख आणि बूथप्रमुख का नाहीत ? आम्हाला फसवता काय ? जिल्हाध्यक्ष यांच्या नेमणुका रद्द करा, अषा शब्दात शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी स्थानिक नेत्यांना खडसावले.

पण हा मेळावा बूथ प्रमुखांच्या नव्हता, तर पदाधिकाऱ्यांचा होता, अस सांगत स्थानिक नेत्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2018 07:39 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close