गडकरींचे पाय धरणारे राष्ट्रवादीचे माजी मंत्री अखेर भाजपात!

गेल्या दोन वर्षांपासून भाजपच्या वेशीवर उभे असलेले लक्ष्मणराव ढोबळे अखेर भाजपात दाखल झाले आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 29, 2019 12:11 PM IST

गडकरींचे पाय धरणारे राष्ट्रवादीचे माजी मंत्री अखेर भाजपात!

सोलापूर, 28 जानेवारी : राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि माजी पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे ढोबळे भाजपात दाखल झाले आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून भाजपच्या वेशीवर उभे असलेले लक्ष्मणराव ढोबळे अखेर भाजपात दाखल झाले आहे. जालन्यात भाजपच्या कार्यकारिणी मेळाव्यात ढोबळेंचा पक्षप्रवेश झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत ढोबळेंचा पक्ष प्रवेश झाला आहे.

वास्तविक पाहता ढोबळे हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. पण दरम्यान, या प्रकरणातून त्यांची निर्दोष सुटका झाली आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला. पण या प्रकरणामुळे राष्ट्रवादीने त्यांना तिकीट नाकारले होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून ढोबळे हे मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होते.Loading...

नितीन गडकरींच्या पडल्या होत्या पाया

फेब्रुवारी 2018 मध्ये राष्ट्रवादीमध्ये असताना लक्ष्मण ढोबळे यांनी चक्क केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे चरणस्पर्श केल्याने खळबळ उडाली होती. ढोबळे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होते. परंतु, भाजपने त्यांच्या प्रवेशाला ब्रेक लावला होता. त्यादरम्यान, गडकरी हे सोलापूरमध्ये एका कार्यक्रमाला आले होते. त्यामुळे भाजपात प्रवेश मिळावा यासाठी ढोबळे यांनी चक्क नितीन गडकरींचे पाय धरले होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी हा प्रकार पाहून राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.

=================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2019 06:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...