S M L

ऑनलाईन सातबारा योजनेचा शुभारंभ, मुख्यमंत्र्यांनी केली डिजीटल स्वाक्षरी

येत्या 1 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व अडीच कोटी उतारे डिजीटल स्वाक्षरीयुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

Sachin Salve | Updated On: May 1, 2018 07:23 PM IST

ऑनलाईन सातबारा योजनेचा शुभारंभ, मुख्यमंत्र्यांनी केली डिजीटल स्वाक्षरी

मुंबई, 01 मे : शेतकऱ्यांचा सातबारा अखेर ऑनलाईन उपलब्ध झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाला. आज १०० गावांमध्ये आज सातबाराचे उतारे ऑनलाईन मिळणार आहेत तसंच, पुढच्या टप्प्यामध्ये सर्व गावांमध्ये ही सुविधा उपलब्ध होईल.

संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. आतापर्यंत आठ लाख सातबारा उतारे डिजीटल स्वाक्षरीने तयार असून येत्या 1 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व अडीच कोटी उतारे डिजीटल स्वाक्षरीयुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली.

महसूल विभागाच्या वतीने आयोजित डिजीटल स्वाक्षरीयुक्त सातबाराचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी कल्याण आणइ ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारे मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसंच ‘आपली चावडी’ या संकेतस्थळाचे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या राज्यातील पुलांच्या आराखड्याच्या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.असा मिळेल डिजीलट स्वाक्षरीचा सातबारा

डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा मिळण्यासाठी https://mahabhulekh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावे. इथं जिल्हा, तालुका, गाव, सर्व्हे क्रमांक/गट क्रमांक आदी माहिती भरावी. त्यानंतर पीडीएफ स्वरुपातील डिजिटल स्वाक्षरी असलेला  सातबारा दिसेल. तो प्रिंट काढून वापरता येईल. सर्व शासकीय कामकाजासाठी हा सातबारा चालणार असून त्यावर पुन्हा कुठलीही स्वाक्षरी करण्याची गरज नाही.

आपली चावडी (http://mahabhumi.gov.in/aaplichawdi ) हे संकेतस्थळ डिजिटल नोटिस बोर्ड असून यावर आपल्या गावातील जमिनीच्या नोंदणीचे फेरफार, फेरफाराची स्थिती आदींची माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच ग्रामसभा, निवडणुका यांची नोटीस,  यामुळे गावात होणाऱ्या जमिनीच्या व्यवहार पारदर्शक होणार आहेत.

Loading...
Loading...

मुख्यमंत्री आणि महसुलमंत्र्यांनी काढला डिजीटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेतस्थळावर जाऊन आपल्या नावावर असलेल्या सातबारा उताऱ्याची माहिती भरली. उताऱ्याची डिजीटल स्वाक्षरी असलेल्या सातबाराची प्रिंटआऊट काढून महसूलमंत्री पाटील यांनी हा उतारा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. त्याचप्रमाणे महसुलमंत्री पाटील यांचा डिजीटल स्वाक्षरी असलेल्या उताऱ्याची प्रिंटआऊट प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी महसूलमंत्र्यांकडे सोपविला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 1, 2018 07:23 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close