लातूर शहरावर पुन्हा पाणीटंचाईचं संकट ! आठ दिवसांतून होतोय एकदा पाणी पुरवठा

लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातला पाणीसाठा संपला असून, आता केवळ मृतसाठ्यावर शिल्लक आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 3, 2018 04:32 PM IST

लातूर शहरावर पुन्हा पाणीटंचाईचं संकट ! आठ दिवसांतून होतोय एकदा पाणी पुरवठा

लातूर, 3 ऑक्टोबर - जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. जिल्ह्याची तहान भागविण्यासाठी विविध ठिकाणांहून रेल्वेनं पाणी आणावं लागलं होतं. लातूर शहरावर आता पुन्हा एकदा भीषण पाणी टंचाईला सामोरं जाण्याची वेळ आलीय. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातला पाणीसाठा संपला असून, आता केवळ मृतसाठ्यावर शिल्लक असल्यानं लातूरकरांचा घसा पुन्हा पाण्यासाठी कोरडा पडण्याची चिन्ह निर्माण झालीयेत.

लातूर जिल्ह्यात यावर्षी आवश्यकतेपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यानं जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणचा पाणी साठा कमी झालाय. जिल्ह्यातील लहान मोठ्या धरणात सुद्धा अत्यल्प जलसाठा उरला असून, अनेक ठिकाणच्या विहिरींनी तळ गाठलाय. विशेषतः साडेपाच लाख लोकसंख्या असलेल्या लातूर शहराला ज्या मांजरा धरणातून पाणी पुरवठा होतो, त्या मांजरा धरणातला पाणी साठा संपला असून गेल्या दोन दिवसांपासून धरणातल्या मृत पाणीसाठ्यावर लातूरकरांची तहान भागवली जातेय.

सध्या लातूर शहराला आठ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होतोय. लातूरकरांना मृतसाठ्यावर येणारी दहा महिने काढावी लागणार आहेत, त्यामुळं पाणी जपून वापरण्याचं आवाहन मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलंय. तर परतीचा पाऊस लातूर जिल्ह्यात चांगला होईल आणि पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याची शक्यता जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी वर्तवलीय.

लातूरच्या प्रकल्पांमध्ये अश्या स्वरूपात आहे पाणी साठा

* मांजरा प्रकल्प -- ०. ६४ %

Loading...

* निम्न तेरणा प्रकल्प -- ३७ . ०५ %

* तावरजा मध्यम प्रकल्प -- ० . ०० %

* रेणापूर मध्यम प्रकल्प -- १२. ८३ %

* व्हटी मध्यम प्रकल्प -- ०१. २० %

* तिरु मध्यम प्रकल्प -- ०. २० %

* देवर्जन मध्यम प्रकल्प -- ३९. ६९ %

* साकोळ मध्यम प्रकल्प --- ६०. २२ %

* घराणी मध्यम प्रकल्प -- ९६. ४० %

* मसलगा मध्यम प्रकल्प -- ३९. ८७ %

* सर्व १४२ मध्यम आणि लघु प्रकल्प -- १५. ७१ %

 VIDEO : अनुसूचित जातीच्या तरुणाला दिली गुरासारखं गुडघ्यावर रांगण्याची 'शिक्षा'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 3, 2018 04:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...