घोडेबाजार टाळण्यासाठी लातूर भाजपाचे नगरसेवक गोव्याच्या सहलीला !

सगळ्याच निवडणुकीत जिंकण्याची महत्वाकांक्षा घेऊन निघालेल्या भाजपानं आता कर्नाटक निवडणुकीनंतर महाराष्ट्रातल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांवर चांगलेच लक्ष केंद्रीत केलं आहे. कारण गुरूवारी लातुरमध्ये भाजपानं आपल्या नगरसेवकांना गोव्यात सहलीसाठी पाठवलं आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 18, 2018 08:10 AM IST

घोडेबाजार टाळण्यासाठी लातूर भाजपाचे नगरसेवक गोव्याच्या सहलीला !

18 मे : सगळ्याच निवडणुकीत जिंकण्याची महत्वाकांक्षा घेऊन निघालेल्या भाजपानं आता कर्नाटक निवडणुकीनंतर महाराष्ट्रातल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांवर चांगलेच लक्ष केंद्रीत केलं आहे. कारण गुरूवारी लातुरमध्ये भाजपानं आपल्या नगरसेवकांना गोव्यात सहलीसाठी पाठवलं आहे. कोणत्याही कारणाने आपले आपले नगरसेवक फुटू नये यासाठी असे डावपेच भाजपकडून आखण्यात आले आहे.

ही बातमी फुटली आहे हे कळताच त्यांनी ऐनवेळी तीनदा नगरसेवकांच्या सहलीची वेळ आणि स्थळही बदललं. मात्र कोणालाही याबाबतची माहिती मिळू नये याची खबरदारी घेणाऱ्या भाजप जिल्हाध्यक्षांचा हा प्रयत्न मात्र फसला. यानंतर संतापलेले भाजप कार्यकर्ते अप्पासाहेब मुंडे यांनी वृत्तांकन करणाऱ्या एका पत्रकाराला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न देखील केला.

त्यावर शहरजिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी सारवासारव करीत हे प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केला. ही शैक्षणिक सहल आहे. याचा खर्च मी स्वत: करतोय असा दावा शैलेश लाहोटी यांनी केला. चित्रिकरण सुरु असताना भाजपाचे प्रवक्ते शैलेश स्वामी यांनी तोंड लपवून घेतले, काही नगरसेवक शाळेच्या पाठीमागे गेले तर काहींनी 'आलोच' असे सांगत काढता पाय घेतला.

भाजपनं या सहलीबद्दल गोपनीयता बाळगली असली तरी देखील ही सहल फक्त निवडणुकीच्या आधीचा खबरदारीचा उपाय असल्याचं मात्र उघडपणे बोललं जातं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 18, 2018 08:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...