परतीच्या पावसानं झोडपलं; दोन ठार, पिकांचं प्रचंड नुकसान

वीज अंगावर पडल्यामुळे शेवगाव तालु्क्यात दोन मजुरांचा मृत्यू. सोयाबीन, ऊस, फळबागां आणि इतर पीकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान.

News18 Lokmat | Updated On: Oct 5, 2018 09:35 PM IST

परतीच्या पावसानं झोडपलं; दोन ठार, पिकांचं प्रचंड नुकसान

लातूर, 5 ऑक्टोबर : लातूर, अहमदनगर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्याला परतीच्या पावासनं अक्षरश: झोडपून काढलंय. वादळी वाऱ्यासह पावसानं जोरदार हजेरी लावली असून, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सर्वात जास्त टंचाईग्रस्त लातूर शहरात शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. जिल्ह्याच्या अनेक भागात गारपीट देखील झालीय.

लातूर जिल्ह्यातील रेणापूरसह अनेक तालुक्यांना गारपीटीनं चांगलंच झोडपून काढलंय. या गारपीटीमुळे सोयाबीनसह इतर पीकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. त्यामुळे आधीच दुष्काळाच्या संकटानं चिंतेत सापडलेल्या लातूरच्या बळीराजावर आता दुहेरी संकट कोसळलंय.

अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालु्क्यात वीज अंगावर पडल्यामुळे दोन मजुरांचा मृत्यू झालाय. मुसळधार पाऊस कोसळत असताना त्या दोघांनी झाडाखाली आश्रय घेतला आणि त्याचवेळी झाडावर वीज कोसळली.

तर सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील बेगेहळ्ळीमध्ये एका घरावर वीज पडून घराला आग लागली. उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं ऊस, फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, नवजा तसेच माण, खटाव या दुष्काळी तालुक्यातही पावसानं हजेरी लावलीय.

 पुण्यातील होर्डिंग दुर्घटनेचे भीषण PHOTOS

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 5, 2018 09:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...