गलिच्छ जागेतील फरसाण कारखान्याच्या तोडफोड प्रकरणी मनसे शहराध्यक्षासह 6 जणांना अटक

अंबरनाथ शहराच्या एमआयडीसी परिसरात गलिच्छ जागेतील फरसाणचा कारखाना उद्धवस्त करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना अटक केलीय. अंबरनाथ मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईसह 6 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलीय.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: May 26, 2018 08:04 PM IST

गलिच्छ जागेतील फरसाण कारखान्याच्या तोडफोड प्रकरणी मनसे शहराध्यक्षासह 6 जणांना अटक

अंबरनाथ, ता. 26 मे : अंअंबरनाथ शहराच्या एमआयडीसी परिसरात गलिच्छ जागेतील फरसाणचा कारखाना उद्धवस्त करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना अटक केलीय. अंबरनाथ मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईसह 6 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलीय.

अनधिकृतपणे सुरू असलेला हा कारखान्याच्या ठिकाणी फरसाण बनवण्यासाठी असणारे साहित्य फेकून देत त्याची तोडफोड मनसैनिकांनी केली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून एमआयडीसी भागांमध्ये गलिच्छ जागेत अनधिकृतपणे हा कारखाना सुरू होता.

याठिकाणी उंदीर, सरडे, माशा मोठ्या प्रमाणात होत्या. शिवाय अळ्या असलेल्या चना पिठाचा फरसाण बनवण्यासाठी वापर केला जात होता. या संबंधीची माहिती मनसेला मिळताच त्यांनी सकाळी या कारखान्यावर धाड टाकून हा कारखाना उध्वस्त केला.

याठिकाणी फरसाण बनवण्याचे काम सुरू असताना मनसैनिकानी या कारखान्यावर धाड टाकली आणि कारखाना उद्धस्त केला. पण दरम्यान बाहेरच्या वस्तू खाताना जरा काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे कोणतेही खाद्यपदार्थ विकत घेताना ते खाण्या योग्य आहेत का याची तपासणी केल्याशिवाय घेऊ नका.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2018 04:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...