तोरंगणा घाटात खासगी बसला भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू

तोरंगणा घाटात खासगी बसला भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू

खाजगी बस दरीत कोसळली असून यात काहीजण दगावल्याचे समजते.

  • Share this:

प्रशांत बाग, प्रतिनिधी, 24 मार्च : पालघर जिल्ह्याच्या मोखाडामध्ये बसचा भीषण अपघात झाला आहे. तोरंगणा घाटात पालघरला येत असताना खाजगी बस 25 फुट दरीत कोसळली आहे. मोखाडा-त्र्यंबकेश्वर रोडवर बस दरीत कोसळली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

या बसमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर बस अपघातामध्ये तब्बल 45 जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींना तात्काळ त्र्यंबकेश्वरमध्ये नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर यात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दल आणि पालघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर अपघातग्रस्तींना मदत करण्याचं काम सध्या सुरू आहे. दरीत कोसळलेली बस सध्या बाहेर काढण्याचं काम सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.मोखाडा अपघातातील 15 जखमी नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींची नाव -

- जैनेश  राणा

- उमेश राणा

- महेश राणा

- आशयाबेन भजियावाली

- दक्षा सय्यब पुरा

- सिराबेन पानवाला

- मयूर सिंगवाला

- अंकिता प्रजापती

- हेमाबेन केरावाला

- मैनाबेन राणा

- सूर्यकांत गाडे

- महेश मणिलाल

- राणू बेन सेन

- राजन सेन

- उमेश राणा

VIDEO: पार्थ पवारांचा अनोखा अंदाज; गाण्यावर धरला ठेका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2019 03:31 PM IST

ताज्या बातम्या