Elec-widget

निवडणुकांनंतर पेट्रोलचे भाव वाढले; 2 महिन्यांनी झाली वाढ

निवडणुकांनंतर पेट्रोलचे भाव वाढले; 2 महिन्यांनी झाली वाढ

मुंबईत पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. तब्बल 58 दिवसांनी पेट्रोलचे दर वाढलेत. निवडणुकांच्या निकालानंतर इंधन दर वाढल्यानं आता यामागे नेमकं कारण काय यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर : पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. तब्बल 58 दिवसांनी पेट्रोलचे दर वाढलेत. पाच राज्यांच्या निवडणुका जवळ आल्यानंतर इंधन दर कमी झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली कपात हे कारण सांगितलं जात असलं, तरी नेमकं तेच कारण होतं की निवडणुका हे कारण होतं याविषयी आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


गुरुवारी मुंबईत पेट्रोलच्या दरात लिटरमागे 11 पैशांनी वाढ झाली आहे. डिझेलचा दर कायम राहिला आहे. मुंबईत आज पेट्रोलचे दर 75.91 रुपये प्रतिलिटर इतके आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होताच पुन्हा ही दरवाढ झाली आहे. कर्नाटक आणि गुजरात निवडणुकीनंतरसुद्धा अशाच प्रकारे इंधनाचे दर वाढले होते.

दिल्लीमध्ये गुरुवारी पेट्रोलचे दर 70.29 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर 64.66 रुपये प्रति लीटर झाले आहेत.


Loading...


दिल्ली

पेट्रोल: 70.29 रुपये प्रति लीटर

डीजल: 64.66 रुपये प्रति लीटर
मुंबई

पेट्रोल: 75.91 रुपये प्रति लीटर

डीजल: 67.66 रुपये प्रति लीटर


2014 चे आयाराम, 2019 चे गयाराम ठरणार? - SPECIAL REPORT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 13, 2018 02:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...