आज न्यूज18 नेटवर्कची 'रायझिंग महाराष्ट्र 2018 समिट'

आज न्यूज18 नेटवर्कची 'रायझिंग महाराष्ट्र 2018 समिट'

न्यूज18 नेटवर्कची 'रायझिंग महाराष्ट्र 2018 समिट ' आज ( 29 आॅक्टोबर)ला पार पडतेय. यात राज्यातले महत्त्वाचे नेते, मान्यवर, वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ सहभागी होणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 26 आॅक्टोबर : न्यूज18 नेटवर्कची 'रायझिंग महाराष्ट्र 2018 समिट ' आज  (29 आॅक्टोबर)ला पार पडतेय. यात राज्यातले महत्त्वाचे नेते, मान्यवर, वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. आणि भविष्यातील महाराष्ट्राच्या रोडमॅपवर चर्चा करणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या समिटमध्ये विशेष उपस्थिती राहणार आहे. महाराष्ट्राच्या विकासाबद्दल त्यांच्या योजना आणि दृष्टिकोन ते आपल्या भाषणातून मांडतील.

मंत्रिमंडळातले वरिष्ठ सदस्य चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, ​सुभाष देसाई यांच्यासह धनंजय मुंडे, हर्षवर्धन पाटील, शेकापचे जयंत पाटील, भाई जगताप यांच्यासारखे विरोधी पक्षांचे नेते या परिषदेत भाग घेणार आहेत. आयटीसी ग्रँड सेंट्र्ल, परेलमध्ये ही समिट पार पडेल.

या समिटबद्दल बोलताना न्यूज 18 लोकमतचे समूह संपादक डॉ. उदय निरगुडकर म्हणाले, "प्रशासनातले मान्यवर आणि लोकांमध्ये महत्त्वपूर्ण संवादातून न्यूज18 नेटवर्कची रायझिंग महाराष्ट्र समिट नवे क्षितिज गाठतेय, याचा मला अभिमान आहे. देशाच्या जीडीपीमध्ये मोलाचं योगदान देणारं महाराष्ट्र हे एक महत्त्वाचं राज्य आहे, दिवसेंदिवस ते बळकट होत आहे. देशाच्या आयकरात महाराष्ट्राचा भरीव वाटा आहे. मुंबई महापालिका देशातली सर्वात श्रीमंत महापालिका आहे. हे आर्थिक महत्त्व पाहता रायझिंग महाराष्ट्र समिट राज्याच्या भवितव्यावर चर्चा करण्यासाठी उत्तम व्यासपीठ आहे, यात शंका नाही."

वरिष्ठ धोरणकर्त्यांसोबत थेट आणि खुली चर्चा करण्यासाठी रायझिंग महाराष्ट्र हे एक प्रभावी व्यासपीठ आहे. त्यासोबतच महाराष्ट्रासमोरच्या संधी आणि आव्हानं यांचा मागोवा घेऊन राज्याच्या सध्याच्या स्थितीवर प्रकाश टाकण्याची मोठी संधी यानिमित्तानं मिळणार आहे. संभाव्य उपाययोजनांवर विचारविनिमय करण्याची आणि त्या पूर्ण होण्याच्या दृष्टीनं काम करण्याची संधी राज्याचे मंत्री, राजकारणी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातल्या उच्चपदस्थांना मिळणार आहे.

न्यूज18 नेटवर्कच्या 'रायझिंग' मालिकेतल्या या समिटला आतापर्यंत अनेक राज्यांत उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. तिथे त्या-त्या राज्यांचा रोडमॅप निश्चित करण्यासाठी संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री आणि धोरणकर्त्यांनी सखोल चर्चा केली. आता ही समिट महाराष्ट्रात होणार आहे. आणि मान्यवरांच्या सहभागानं ती निश्चितच पुढचा टप्पा गाठेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2018 02:27 PM IST

ताज्या बातम्या