News18 Lokmat

#MeToo: निवडणुकांआधी माझ्यावर आरोप लावण्याचा अजेंडा असू शकतो - एम जे अकबर

केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे अकबर यांनी भारतात येताच ईमेलद्वारे आपला राजीनामा पाठवला असल्याची चर्चा आहे. अकबर यांच्यावर महिला पत्रकाराचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होता.

News18 Lokmat | Updated On: Oct 14, 2018 04:11 PM IST

#MeToo: निवडणुकांआधी माझ्यावर आरोप लावण्याचा अजेंडा असू शकतो - एम जे अकबर

मुंबई, 14 आॅक्टोबर : केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे अकबर यांनी भारतात येताच ईमेलद्वारे आपला राजीनामा पाठवला असल्याची चर्चा आहे. अकबर यांच्यावर महिला पत्रकाराचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आपला राजीनामा दिला असल्याचं सांगण्यात आहे. यासंदर्भात अकबर यांनी सुषमा स्वराज यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे.

पण अखेर आता या सगळ्या प्रकारावर एम जे अकबर यांनी मौन सोडले आहे. निवडणुकांआधी माझ्यावर आरोप करणं हा एक अजेंडा असू शकतं असं अकबर यांनी म्हटलं आहे. तर यासंदर्भात त्यांनी सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही सांगितलं आहे.

अकबर यांच्यावर अनेक महिला पत्रकारांनी लैंगिक आत्याचाराचा आरोप केला आहे. पण त्यावर भाजपमधून अद्याप एकाही नेत्याने प्रतिक्रिया दिलेली नाही. अकबर यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या आल्यानंतरही नितीन गडकरी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधातील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी दिली होती. पण या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे, हेही पाहावं लागेल, असंही शहा म्हणाले होते.

एम. जे. अकबर यांच्याविषयी पक्षाकडून आलेली ही पहिलीच अधिकृत प्रतिक्रिया आहे. #MeToo  मोहिमेंतर्गत एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. यानंतर परदेशात असणाऱ्या अकबर यांना सरकारने ताबडतोब भारतात बोलावून घेतले.अकबर हे मीडिया संस्थांमध्ये संपादक म्हणून कार्यरत असताना अनेक महिला पत्रकारांसोबत त्यांनी आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप झालाय.

Loading...

काँग्रेसनेही केली होती अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी

#MeToo चळवळीत लैंगिक छळाचा आरोप झालेले परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम.जे.अकबर यांची हकालपट्टी करावी अशी मागणी काँग्रेसनेही केली होती. पक्षाचे प्रवक्ते जयपाल रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. अकबर यांच्यावर चार महिला पत्रकारांनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर दबाव येतोय. त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांची हकालपट्टी करा अशी मागणीही होत होती.

#Metoo : उषा नाडकर्णी कडाडल्या; काय म्हणाल्या बघा..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 14, 2018 11:19 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...