नाट्य संमेलन सुरू होण्याआधीच वादाची नांदी

ज्येष्ठ नाट्यनिर्मात्या लता नार्वेकर ह्यांनी ह्या संमेलनाला हजर न राहण्याचा निर्णय घेतलाय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 12, 2018 12:31 PM IST

नाट्य संमेलन सुरू होण्याआधीच वादाची नांदी

मुंबई, 12 जून : 98व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन सुरू होण्याआधीच वादाची नांदी सुरू झालीये. ज्येष्ठ नाट्यनिर्मात्या लता नार्वेकर ह्यांनी ह्या संमेलनाला हजर न राहण्याचा निर्णय घेतलाय. संमेलनाची पत्रिका फक्त व्हाट्सअॅपवरून पाठवणे. तसंच संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत नाट्य परिषदेच्या कार्यकारी समितीपेक्षा भाजप नेत्यांची नावं अधिक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

संस्कृतिक मंत्री विनोद तावडे सलग 4 वर्ष नाट्य संमेलनाला आले नाहीत. मात्र निमंत्रण देताना फक्त राज ठाकरेंकडे गेले.उद्धव ठाकरेंकडे गेले नाहीत. ह्यात राजकारण असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलंय. त्यामुळेच त्यांनी तब्येत ठणठणीत असूनही ह्या संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतलाय.

उद्यापासून 15 जूनपर्यंत नाट्यसंमेलन सुरू असेल. मुलुंडच्या कवी कालिदास नाट्यमंदिरात संमेलन होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2018 12:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...