हे कुणाचं सरकार ?, गेल्या 3 वर्षांत राज्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या

२०१४ पासून जुलै २०१७ पर्यंत महाराष्ट्रात तब्बल ८ हजार ६५१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 14, 2017 07:22 PM IST

हे कुणाचं सरकार ?, गेल्या 3 वर्षांत राज्यात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या

14 नोव्हेंबर : राज्यात एकीकडे फडणवीस सरकार तीन वर्षपूर्ती साजरी करतोय. सरकारकडून कर्जमाफी, जलयुक्त शिवार योजनेतील आम्ही लाभार्थी अशी जाहिरातबाजी सुरू आहे. तर दुसरीकडे  राज्यात गेल्या तीन वर्षात सर्वाधिक आत्महत्या केल्याचा आकडा समोर आलाय.

मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गुजरातपेक्षा महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत.ो असून, मध्य प्रदेशात ४ हजार ९८, कर्नाटकात २ हजार ४४८, तर गुजरातमध्ये ९५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

देशाच्या नकाशावर नजर टाकली असता शेतकरी आत्महत्येत महाराष्ट्राचा सर्वात वरचा, तर मध्य प्रदेशचा दुसरा क्रमांक असल्याचे दिसून येते. २००१ ते २०१६ पर्यंतच्या या दोन राज्यांतील शेतकरी आत्महत्यांचे आकडे बघितल्यास गेल्या सहा वर्षांत महाराष्ट्रात २४ हजार ३१५ तर मध्य प्रदेशात २१ हजार ३७८ शेतकऱ्यांनी जीवन संपविल्याचे धक्‍कादायक वास्तव समोर आलंय. त्यामुळे हे माझं सरकार म्हणणाऱ्या सरकारलाच हे कुणाचं सरकार असा सवाल उपस्थितीत होतोय.

महाराष्ट्र शेतकऱ्यांचा सर्वाधिक आत्महत्या

Loading...

         महाराष्ट्र     मध्यप्रदेश     कर्नाटक

2014   1981          826           122

2015   3228          1290          1478

2016   3052          4098          2448

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2017 07:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...