रघुवीर घाटात दरड कोसळली.. सुदैवाने मोठी दुर्घटना टाळली

रघुवीर घाटात दरड कोसळली.. सुदैवाने मोठी दुर्घटना टाळली

रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेड-खोपी-अकल्पे मार्गावरील रघुवीर घाटात रविवारी दुपारी 4 वाण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळली.

  • Share this:

रत्नागिरी, 30 जून- रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेड-खोपी-अकल्पे मार्गावरील रघुवीर घाटात रविवारी दुपारी 4 वाण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळली. घाटामध्ये असणाऱ्या एका हॉटेलसमोर भलीमोठी दरड कोसळली सुदैवाने मोठी दुर्घटना टाळली आहे.

रघुवीर घाटात पावसाचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक येतात. या घाटातच एक हॉटेल आहे. याच हॉटेल शेजारील डोंगराचा मोठा भाग खचून मोठी दरड मार्गावर आली. या हॉटेलच्या काही फूट अंतरावर ही दरड येऊन थांबली. या वेळी हॉटेलमध्ये अनेक पर्यटक होते. एका बाजूला उंच डोंगर कडा आणि दुसऱ्या बाजूला हजारो फूट खोल दरी असा हा परिसर आहे. हॉटेलमधील पर्यटकांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. दरड कोसळली तेव्हा सुदैवाने रस्त्यावर कोणाही नव्हते. मात्र घाटात वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पर्यटकांनीच रस्त्यावरील माती-दगडांचा ढिगारा हटवण्याचे काम केले. दुर्दैवाची बाब म्हणजे संध्याकाळी उशिरापर्यंत एकही शासकीय अधिकारी घटनास्थळी आला नाही. परिणामी सातारा जिल्ह्यात समाविष्ट असणाऱ्या कोयना अभयारण्याच्या पायथ्याशी वसलेल्या शिंदी, वळवण, उचाट, मोरणी, वाघावळे, अकल्पे अशा एकूण 15 गावांचा संपर्क तुटला आहे.

दुसरीकडे, भिवंडी शहरातील चव्हाण कॉलनी इथे बौद्ध स्मशानभूमीची भिंत कोसळली आहे. भिवंडीत मुसळधार पावसामुळे बौद्ध स्मशानभूमीची भिंत कोसळली असून यामध्ये सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. या भिंती लागत मोठी लोकवस्ती आहे. मुले दररोज या ठिकाणी खेळत असतात. एवढेच नाही तर शौचासही बसतात. मात्र भिंत आतल्या बाजूला कोसळल्याने मुले थोडक्यात बचावली. या भिंतीला मागील काही दिवसांपासून तडे गेले आहे. मात्र महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आधीच वर्तवण्यात आली होती.

SPECIAL REPORT : 'दंगल' गर्लची बॉलिवूडमधून एक्झिट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 30, 2019 08:10 PM IST

ताज्या बातम्या