S M L

बडोद्यातील 91व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख

अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या पंचरंगी लढतीत देशमुख यांना ४२७ मते मिळाली तर शोभणे यांना केवळ ३५७ मते मिळाली आहेत.

Sonali Deshpande | Updated On: Dec 10, 2017 02:32 PM IST

बडोद्यातील 91व्या मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख

नागपूर, 10 डिसेंबर : ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या पंचरंगी लढतीत लक्ष्मीकांत देशमुख यांनी बाजी मारली आहे. कोण होणार संमेलनाध्यक्ष, याकडे अवघ्या साहित्य विश्वाचे लक्ष लागले होते. डॉ. किशोर सानप, डॉ. रवींद्र शोभणे, रवींद्र गुर्जर, लक्ष्मीकांत देशमुख आणि राजन खान हे पाच उमेदवार यंदा निवडणूक रिंगणात होते.

ज्येष्ठ कादंबरीकार, कथालेखक लक्ष्मीकांत देशमुख निवडून आले आहेत. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार साहित्यिक रविंद्र शोभणे यांचा ७० मतांनी पराभव केला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या पंचरंगी लढतीत देशमुख यांना ४२७ मते मिळाली तर शोभणे यांना केवळ ३५७ मते मिळाली आहेत.

बडोदा ही पुरोगामी राजे सयाजीराव गायकवाड यांची कर्मभूमी आहे. या शहरात होणाऱ्या संमेलनाचे अध्यक्षपद मला लाभले हे मी माझे सौभाग्य समजतो.   अशा भावना देशमुख यांनी व्यक्त केल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 10, 2017 02:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close