पती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या

पती गेल्यानंतर खंबीरपणे लढल्या, दुष्काळामुळे मात्र सरण रचून आत्महत्या

पतीच्या निधनानंतर स्वत: शेतीची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलेनं भीषण दुष्काळासमोर हात टेकले आहेत.

  • Share this:

बुलडाणा, 16 नोव्हेंबर : शेतकरी महिलेने नापिकी आणि कर्जबाजारीपणातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आशा दिलीप इंगळे असं आत्महत्या केलेल्या शेतकरी महिलेचं नाव आहे. आशा यांनी स्वतःचं सरण रचून त्यामध्ये उडी घेत आत्महत्या केली. पतीच्या निधनानंतर स्वत: शेतीची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिलेनं दुष्काळासमोर हात टेकले आहेत.

दुष्काळाग्रस्त बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी गावात ही घटना घडली आहे. आशा इंगळे या यंदाच्या दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडल्या होत्या. त्यांना कर्ज फेडण्याच्या चिंता होती आणि त्यात नापिकीमुळे त्यांचं संकट वाढलं होतं. दुष्काळामुळे अतिशय बिकट परिस्थिती येणार, असं त्यांना वाटत होतं. दुहेरी संकटामुळे नैराश्यात आशा यांनी टोकाचं पाऊल उचचल्याचं समोर येत आहे.

सतत तीन वर्षापासून अल्प पावसामुळे सातत्याने घटत असलेल्या पीक परिस्थितीने आर्थिक संकटात अडकलेल्या या शेतकरी महिलेने आपल्या गुरांच्या गोठ्यात स्वतःचे सरण रचसं. त्यामध्ये उडी घेऊन जाळून घेत आत्महत्या केली आहे. ह्या घटनेने पुन्हा एकदा दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांचं भीषण वास्तव समोर आलं आहे.

आशा इंगळे यांची कौटुंबिक परिस्थिती

-आशा इंगळे यांच्याकडे साडे तीन एकर जमीन होती, अशी माहिती समोर येत आहे.

-आशा यांच्या पतीचं 2008 मध्ये निधन झालं. पतीच्या निधनांतर शेतीची जबाबदारी त्यांनी स्वत:कडे घेतली.

-आशा यांना एक मुलगी आहे, तिचं लग्न झालं आहे.

-त्यांना दोन मुलेही आहेत. दोघंही रोजंदारीवर काम करतात.


VIDEO : 'राम तेरी गंगा मैली...', शुभ्र दिसणारा गोदामाईच्या पाण्याचा प्रवाह आहे जीवघेणा


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2018 11:30 AM IST

ताज्या बातम्या