• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO ...आणि बघता बघता त्याने स्वतःचीच नवी कोरी बाईक चक्क पेटवून दिली
  • VIDEO ...आणि बघता बघता त्याने स्वतःचीच नवी कोरी बाईक चक्क पेटवून दिली

    News18 Lokmat | Published On: Mar 27, 2019 04:43 PM IST | Updated On: Mar 27, 2019 04:43 PM IST

    कोपरगाव, 27 मार्च : नवीन बाईकचं इंजिन सारखं खराब होतं, त्यात वारंवार बिघाड होत असूनही कंपनी आणि शोरूममध्ये कोणी दखल घेत नसल्याने चिडून तरुणाने नवी कोरी मोटारसायकल जाळून टाकली. कोपरगाव इथल्या प्रमोद निर्मळ या तरुणाने दोन महिन्यांपूर्वी होंडा यूनिकॉर्न ही गाडी विकत घेतली होती. गाडी सारखी बंद पडते हे सांगून आणि वारंवार तक्रार देऊन त्याचं निराकरण झालं नाही. म्हणून या तरुणाने हे टोकाचं पाऊल उचललं असं त्याचं म्हणणं आहे. आजही शोरूमचे लोक उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचं प्रमोद म्हणतो आहे. कोपरगावच्या भन्साळी शोरूमच्या समोरच हा धक्कादायक प्रकार घडला. अग्निशमन दलाने गाडीची आग विझवली मात्र तोवर मोटारसायकल जळून खाक झाली होती .

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी