कोकण रेल्वेचं पावसाळी वेळापत्रक आजपासून लागू

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 10, 2017 10:40 AM IST

कोकण रेल्वेचं पावसाळी वेळापत्रक आजपासून लागू

10 जून : कोकण रेल्वे आजपासून पावसाळी वेळापत्रकानुसार धावणार आहे. कोकणात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

दरवर्षी कोकण रेल्वे आपलं पावसाळी वेळापत्रक 10 जूनपासून लागू करते. यावर्षीही याची अंमलबजावणी आजपासून होणार आहे.

कोकण रेल्वेच्या या नव्या पावसाळी वेळापत्रकानुसार कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या वेळा 1 तासाच्या फरकानं बदलण्यात आल्या आहेत. यात राजधानी, जनशताब्दी आणि तेजससारख्या वेगवान ट्रेन्सचाही समावेश असेल.

कोकणात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. पावसात नेहमीच निवसर आणि पोमेंडीजवळ ट्रॅक खचतो. त्यासाठी कोकण रेल्वेवरील गाड्यांचा वेग कमी केला जातो.

कोकण रेल्वे पावसाळी वेळापत्रकानुसार :

Loading...

ट्रेन क्रमांक १०११२ मडगाव-छत्रपती शिवाजी टर्मिनस कोकणकन्या एक्स्प्रेस ही सावंतवाडी येथून सायं. ६.१५ऐवजी सायं. ७.३६ वाजता सुटेल. (११००४) दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस ही सावंतवाडी येथून सायं. ५.३०ऐवजी ६.५० वाजता सुटेल. (१०१०४) मांडवी एक्स्प्रेस ही सावंतवाडी येथून स. १०.०६ऐवजी १०.४५ वाजता सुटेल. (५०१०६) दिवा-पॅसेंजर ही सावंतवाडी येथून सकाळी ८.३० वाजता सुटेल.    

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2017 10:40 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...