04 सप्टेंबर: कोकण रेल्वेचं कोलमडलेलं वेळापत्रक अजूनही सुस्थितीत आलेले नाही .आज परिस्थिती थोडी सुधारेल असं कोकण रेल्वेच्या प्रशासनाने सांगितलं होतं.
गेले काही दिवस सात ते आठ तास उशीराने धावत असणाऱ्या कोकण रेल्वेच्या काही गाड्या आता तीन ते पाच तास उशीराने धावत आहेत. तर काही गाड्यांचं वेळापत्रक अजूनही विस्कळीतच आहे. या सगळ्याचा फटका कोकणात गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना बसलाय. ऐन उत्सवाच्या काळातच रेल्वे बेभरवश्याची झाल्यामुळे लक्झरी बसकडे त्यांना वळावं लागलं. पण लक्झरी बसचे मालकही त्यांची लूट करत आहेत. प्रवाशांना या बसेसतच्या तिकीटासाठी दामदुप्पट पैसे मोजावे लागत आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा