कोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्राशी जोडणार

कोकण रेल्वेच्या कोल्हापूर-वैभववाडी या 103 कि.मी. च्या रेल्वेमार्गाच्या कामाचा लवकरच श्रीगणेशा होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 1, 2018 07:01 PM IST

कोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्राशी जोडणार

मुंबई, 1 ऑगस्ट : कोकण रेल्वेच्या कोल्हापूर-वैभववाडी या 103 कि.मी. च्या रेल्वेमार्गाच्या कामाचा लवकरच श्रीगणेशा होणार आहे. केंद्रीय वाणिज्य, उद्योग आणि नागरी विमानवाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दिल्लीत पार पडलेल्या कोकण रेल्वेच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. या बैठकीला रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, कोकण रेल्वेचे सीएमडी आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लवकरच कोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्राशी जोडल्या जाणार आहे. कोकण रेल्वेच्या आढावा बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाच्या विकासाला आणखी चालना मिळणार आहे. नव्याने होऊ घातलेला कोल्हापूर-वैभववाडी हा रेल्वे मार्ग रिफायनरीतून पेट्रोलियम व पेट्रोकेमिकल्सची वाहतुक करण्यासाठी अत्यंत सोयीचा राहणार आहे. देशातील इतर भाग आपल्या किनारपट्टीच्या प्रदेशांना जोडल्या गेले तर महाराष्ट्राचा झपाट्याने विकास होऊ शकतो असा दावा सुरेश प्रभुंनी यांनी केलाय.

याशिवाय कोकण रेल्वे क्षेत्रातील गावांचा आणि शहरांचा अधिस विकास घडून आणण्यासाठी 10 आणखी नवीन स्थानके बांधली जाणार आहेत. त्यापैकी पहिल्या रेल्वे स्थानकाचे काम सुरू झाले असून, त्याचे उद्घाटन जानेवारी 2019 मध्ये होणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे सीएमडी यांनी दिली.

रेल्वे मंत्रालयाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग मंजूर केली आहे. या प्रकल्पासाठी भारतीय रेल्वे 50 % आणि बाकीचा खर्च महाराष्ट्र सरकार उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा..

VIDEO : 'आम्ही जर नसलो तर कसं होणार?,आम्हाला आमचा धंदा करू द्या'

जळगावात मतदान सुरू असताना एका वाहनात सापडल्या नोटा

रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची वाढ : ग्राहकांना फटका, गृहकर्ज महागणार

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 1, 2018 06:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close