टोलनाक्यावर लेन तोडून टेम्पो केबिनवर आदळला,अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात

टोलनाक्यावर लेन तोडून टेम्पो केबिनवर आदळला,अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात

कोल्हापूरमध्ये टोलनाक्यावर भरधाव टेम्पोचा अंगाचा थरकाप उडवणारा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

  • Share this:

23 डिसेंबर : कोल्हापूरमध्ये टोलनाक्यावर भरधाव टेम्पोचा अंगाचा थरकाप उडवणारा अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. उलट्या दिशेनं आलेला भरधाव टेम्पो टोलनाक्यावर आदळला. या अपघातात 3 जण जखमी झाले आहे.

कोल्हापूरच्या कोगनोळी टोलनाक्यावर आज सकाळी एक भरधाव टेम्पो उलट्या दिशेनं आला आणि टोलनाक्याच्या केबिनवर आदळला. हा अपघात इतका भीषण होता की जेव्हा टेम्पे केबिनवर आदळला तेव्हा टेम्पोचालक काच तोडून बाहेर फेकला गेला.  या अपघातात तीन जण जखमी झालेत. हे तिघेही निपाणीचे असल्याचं सांगण्यात येतंय. अपघातानंतर टेम्पोचा चालक पळून गेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 23, 2017 10:46 PM IST

ताज्या बातम्या