News18 Lokmat

कोल्हापुरात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड

कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झालीय. दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई सुरू केलीय.

News18 Lokmat | Updated On: Jul 15, 2018 02:01 PM IST

कोल्हापुरात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड

कोल्हापूर, 15 जुलै : कोल्हापुरात  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झालीय.  दूध आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही  कारवाई सुरू केलीय. उद्यापासून स्वाभिमानीचे दूध दर आंदोलन सुरू होणार आहे. सरकारकडून दूध आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्वाभिमानी संघटनेनं केला आहे.  कोल्हापूर पोलिसांनी आतापर्यंत 25 हून अधिक कार्यकर्त्यांना  ताब्यात  घेतले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) सोमवारी 16 जुलै रोजी एक दिवस दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात गोकुळ उद्या दूध संकलित करणार नाही. त्यामुळे राज्यात दुधाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे.

एकट्या मुंबईला गोकुळकडून सात लाख लीटर दूध पुरवठा केला जातो. राज्य सरकारने गाईच्या दुधाला प्रतिलिटर 5 रुपयांची दरवाढ करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. संघटनेकडून आता मुंबईला जाणारे दूध रोखण्याची घोषणा करण्यात आली आहे. एक दिवस संकलन बंद केल्यामुळे गोकुळला सुमारे 5 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार आहे.

हेही वाचा

अमित ठाकरेंच्या या 10 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

Loading...

मराठवाडा दौऱ्यातून होणार नव्या ठाकरेंची एण्ट्री; मनसेचा असेल हा मास्टर प्लॅन

धावत्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये महिलेने दिला जुळ्यांना जन्म

गोकुळला एक दिवसाचे सुमारे पाच कोटींचे नुकसान होणार असूनही त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे, गाईच्या दुधाला आणि दूध पावडरला अनुदान द्यावे अशा मागणी, गोकुळने सर्वातआधी केली होती. यासाठी जिल्हाधिकारी कार्यावर मोर्चाही काढण्यात आला होता. मात्र त्यावर कोणताच निर्णय न झाल्यामुळे गोकुळने एक दिवस संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शिवाय या आंदोलनामुळे राज्य सरकारने संघटनेची मागणी मान्य केली तर त्याचा फायदा दूध उत्पादकांना होणार असल्यामुळे नुकसान सहन करुनही गोकुळने एक दिवस दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 15, 2018 01:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...