पंचगंगेने आेलांडली धोक्याची पातळी; कोल्हापूर-गगनबावडा मार्ग बंद!

कोकण पट्ट्यात आणि धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून, पंचगंगा आणि कृष्णा या दोन नद्यांनी धोक्याची पातळी आेलांडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 16, 2018 07:08 PM IST

पंचगंगेने आेलांडली धोक्याची पातळी; कोल्हापूर-गगनबावडा मार्ग बंद!

कोल्हापूर, ता. 16 जुलै : कोकण पट्ट्यात आणि धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे. पंचगंगा आणि कृष्णा या दोन नद्यांना धोक्याची पातळी आेलांडली  असून, कोल्हापूर-गगनबावडा हा मार्ग पाण्याखाली गेल्याने तो बंद करण्यात आला आहे.

'स्वाभिमानी'चे कार्यकर्ते बेभान, ट्रकचालकासह ट्रक पेटवला

नरेंद्र मोदींच्या सभेत मंडप कोसळला, 20 जण जखमी

कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासून पावसाचा जोर वाढलाय. जिल्ह्यातील 70 बंधारे काठोकाठ भरले असून, त्यापैकी बहुतांश बंधारे आेसंडून वाहताहेत. धरण क्षेत्रात अतिवृष्टी सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्या पंचगंगा आणि  कृष्णा या दोन्ही नद्यांनी पाणीपातळी आेलांडली आहे. पंचगंगेने 40 फूट 4 इंच पातळी गाठली असून, कोल्हापूर-गगनबावडा हा मार्ग पाण्याखाली गेल्याने तो बंद करण्यात आलाय.

चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याने का होतात वाद? ही आहेत त्यांची वादग्रस्त वक्तव्य

UP: बलात्कारकरून महिलेला जिवंत जाळले, 100 नंबरला फोन करुनही मिळाली नाही मदत

हातकणंगले तालुक्यातील हेरले या गावात घराची भिंत पडून एका महिलेचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात सर्वदूर सुरु असलेल्या पावसाचा फटका कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गालाही बसलाय. अतिवृष्टीमुळे तो सुद्धा काही काळ बंद करण्यात आला होता. यामुळे महामार्गावरील वाहतुक काही काळ बंद करण्यात आली होती. पंचगंगा आणि कृष्णेच्या काठावरील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा  देण्यात आला आहे. जिल्ह्यातील राधानगरी हे धरणही ८० टक्के भरले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

 

प्रेमा तुझा रंग कसा'तून उलगडणार गुलाबी प्रेमाची काळी बाजू

...म्हणून पाकिस्तानात वाढत आहेत हिंदू मतदार

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 16, 2018 07:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close