News18 Lokmat

कोल्हापुरात 67 लाखांचा ऑनलाइन दरोडा, बँकिंग क्षेत्रात खळबळ

हॅकर्सने 67 लाखांची रक्कम लंपास केली आहे. हॅकिंगद्वारे एवढी मोठी रक्कम लंपास करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 08:50 AM IST

कोल्हापुरात 67 लाखांचा ऑनलाइन दरोडा, बँकिंग क्षेत्रात खळबळ

कोल्हापूर, 22 एप्रिल : कोल्हापुरातील एचडीएफसी बँकेवर ऑनलाइन दरोडा टाकण्यात आला आहे. यामध्ये हॅकर्सनी तब्बलव 67 लाख रुपये लंपास केले आहेत. या ऑनलाइन दरोड्याने बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

एचडीएफसी बँकेच्या कोल्हापूरमधील शाहूपुरी शाखेवर हा ऑनलाइन दरोडा पडला आहे. हॅकर्सने 67 लाखांची रक्कम लंपास केली आहे. हॅकिंगद्वारे एवढी मोठी रक्कम लंपास करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु याप्रकरणी अद्यापपर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. लवकरात लवकर आरोपींचा शोध घेतला जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे याबाबत उपाययोजना करण्याची मागणी समोर येत आहे.


Loading...

ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं भरधाव टेम्पो उलटला, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 08:50 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...