कोल्हापूर पालिका पोटनिवडणुकीत भाजप ताराराणी आघाडीचा विजय

भाजप ताराराणी आघाडीचे उमेदवार रत्नेश शिरोळकर 200 मतांनी विजयी झाले आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 12, 2017 12:01 PM IST

कोल्हापूर पालिका पोटनिवडणुकीत भाजप ताराराणी आघाडीचा विजय

11 आॅक्टोबर :  कोल्हापूर महानगरपालिका पोटनिवडणुकीत भाजप ताराराणी आघाडीने बाजी मारलीये.  भाजप ताराराणी आघाडीचे उमेदवार रत्नेश शिरोळकर 200 मतांनी विजयी झाले आहे.

कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक ११, ताराबाई पार्क मतदार संघात झालेल्या पोट निवडणुकीत भाजप आणि ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजेश लाटकर यांचा पराभव केला. शिरोळकर यांना १३९९ तर लाटकर यांना ११९९ मतं पडली. शिवसेना उमेदवार राज जाधव यांना अवघी ८० मते पडली.

जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसह तीन आमदार, महापौर, उपमहापौरांसह सर्व नगरसेवकांचा सहभाग असलेल्या कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक ११, ताराबाई पार्क येथील पोटनिवडणुकीसाठी बुधवारी केवळ ५८ टक्के मतदान झालं होतं.

या निवडणुकीत एकमेकांना राजकीय शह देण्याच्या हेतूने नेत्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला खरा, परंतु मतदारांनी मात्र मतदान प्रक्रियेत निरूत्साह दाखविल्याने मतदानानंतर विजयी कोण होणार याबाबत कमालीची उत्कंठा लागून राहिली होती.

माजी नगरसेवक नीलेश देसाई यांचा जातीचा दाखला अवैध ठरल्यामुळे प्रभाग क्रमांक ११, ताराबाई पार्क येथे पोटनिवडणूक झाली होती.

Loading...

आज झालेल्या मतमोजणीत रत्नेश शिरोळकर यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांना पराभूत केलंय.रत्नेश शिरोळकर यांना 1399 मतं मिळाली तर राजेश लाटकर यांना 1199 मतं मिळाली. 200 मतांनी शिरोळकर विजयी झाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2017 11:45 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...