कोल्हापूर लोकसभा निवडणूक : महाडिक VS मंडलिक, राष्ट्रवादीसमोर जागा राखण्याचं आव्हान

कोल्हापूर लोकसभेच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान खासदार भीमराव महाडिक यांनाच पुन्हा रिंगणात उतरवलं होतं. त्यांची लढत शिवसेनेचे संजय सदाशिव मंडलिक यांच्याशी होती.

News18 Lokmat | Updated On: May 22, 2019 01:06 PM IST

कोल्हापूर लोकसभा निवडणूक : महाडिक VS मंडलिक, राष्ट्रवादीसमोर जागा राखण्याचं आव्हान

कोल्हापूर, 9 मे : कोल्हापूर लोकसभेच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांनाच पुन्हा रिंगणात उतरवलं होतं. त्यांची लढत शिवसेनेचे संजय सदाशिव मंडलिक यांच्याशी होती.

एकेकाळी काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये नंतर राष्ट्रवादीने कब्जा घेतला. 2014 मध्ये मोदी लाटेतही राष्ट्रवादीचे भीमराव महाडिक निवडून आले. यावेळी पुन्हा एकदा धनंजय महाडिक विरुद्ध संजय मंडलिक यांच्यातच लढत होती.

मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला यश

2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांनी शिवसेनेचे संजय मंडलिक यांचा पराभव केला होता. तिसऱ्या स्थानावर शेतकरी कामगार पक्षाचे संपतराव पवार होते.

कोल्हापूर हा काँग्रेसचा गड मानला जायचा. 1952 मध्ये पहिल्यांदा इथे काँग्रेसचे रत्नाप्पा कुंभार निवडून आले. त्यानंतर दोन निवडणुका सोडल्या तर 1999 पर्यंत इथे काँग्रेसचंच वर्चस्व होतं.

Loading...

सदाशिवराव मंडलिक यांचं वर्चस्व

1998 मघ्ये काँग्रेसचे सदाशिवराव मंडलिक कोल्हापूरमधून निवडून आले. नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2009 च्या निवडणुकीत ते अपक्षही लढले होते.

याआधी सेना, भाजपला यश नाही

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राधानगरी, करवीर, उत्तर कोल्हापूर, दक्षिण कोल्हापूर. चंदगड आणि कागल हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. याआधी शिवसेना आणि भाजप लोकसभा निवडणुकीत यश मिळवू शकलेली नाही.

तिसऱ्या टप्प्यात मतदान

लोकसभा निवडणुकासाठी कोल्हापूरमध्ये तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान झालं. पश्चिम महाराष्ट्रातल्या या महत्त्वाच्या जागेवरच्या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष होतं.

=============================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 9, 2019 04:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...