ग्रामपंचायत कार्यालयात तुंबळ हाणामारी; सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद

ग्रामपंचायत कार्यालयात तुंबळ हाणामारी; सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद

कोल्हापूरातील गारगोटी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात किरकोळ कारणावरुन तुंबळ हाणामारीचा प्रकार घडलाय.

  • Share this:

कोल्हापूर, 9 सप्टेंबर : कोल्हापूरातील गारगोटी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात किरकोळ कारणावरुन तुंबळ हाणामारीचा प्रकार घडलाय. गारगोटी बाजारपेठेतील एक छोटं दुकान हटवण्याच्या कारणावरुन हि हाणामारी झाल्याचं समजतंय. सीसीटीव्ही कॅमऱ्यात हा सगळा प्रकार कैद झालाय. याप्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर सध्या या प्रकारावरुन परिसरात तणावाचं वातावरण असून प्रशासकिय अधिकारी आणि कर्मचारी या घटनेचा निषेध करण्यासाठी धरणे आंदोलन करणार आहेत.

गारगोटी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात तुंबळ हाणामारीचा प्रकार घडला आहे. ग्रामपंचायत कार्यालयावर हल्ला करून कार्यालयाची तोडफोड आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी 11 जणांवर भुदरगड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. गारगोटी बाजारपेठेतील टपरी हटवण्यावरुन दोन गटात वाद सुरू होता आणि त्यानंतर या वादाचे पर्यावसन हाणामारीमध्ये झाले. ही सगळी माहाणामारी आणि धक्काबुक्की सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. राजकीय वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा असून एखाद्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात हाणामारी होण्याचा कोल्हापूर जिल्ह्यातील हा पहिलाच प्रकार आहे.

मारहाण आणि तोडफोडप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. मात्र, तणावाचं वातावरण असल्यामुळे गारगोटी परिसरातील संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. तर या घटनेचा निषेध करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी सोमवारी धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती आहे.

 PHOTOS : बाप्पाच्या स्वागतासाठी पुणेकर सज्ज; बाजारपेठ सजली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2018 10:04 PM IST

ताज्या बातम्या