यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही-चंद्रकांत पाटील

News18 Lokmat | Updated On: Sep 6, 2018 11:34 PM IST

यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही-चंद्रकांत पाटील

कोल्हापूर, 06 सप्टेंबर : विधानसभा, लोकसभा आणि पदवीधर निवडणूक लढवण्याचा असा कोणताही इरादा नाही असं सांगत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणाच करून टाकलीये. त्यांच्या घोषणेमुळे राजकीय वातावरणात एकच खळबळ उडालीये.

कोल्हापूर इथं झालेल्या एका कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी कोल्हापूर डाॅल्बीमुक्तीबद्दल कोल्हापूरकरांचे आभार मानले. ते म्हणाले, गेल्या वर्षी आपण सगळ्यांनी एक संकल्प केला होता. संपूर्ण कोल्हापूर आता डाॅल्बीमुक्त झालाय. आता दोन महिन्यांपूर्वी  एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्यावर गणपती मंडळात डीजे वापरल्यामुळे गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी कोर्टात कोल्हापूरच्या डाॅल्बीमुक्तचा उल्लेख झाला होता असं पाटील म्हणाले.

आपण सगळ्यांनी मिळून हा विषय लावून धरला. मलाही  दहा दिवस इथंच थांबावं लागलं. सगळ्या मंडळांना जावून समजूत काढावी लागली. पण हा काही माझा व्यक्तीगत अजेंडा नाही. मला कोणतीही निवडणूक लढवायची नव्हती.

माझा कोणताही निवडणूक लढवण्याचा अजेंडा नव्हता असं पाटील म्हणाले.

तसंच मी नेहमी सांगतो की, आपला राजकीय अजेंडा हा न्यायक असला पाहिजे. तो राबवता आला पाहिजे. मला विधानसभा, लोकसभा आणि पदवीधर निवडणूक लढवण्याचा असा कोणताही इरादा नाही असं चंद्रकांत पाटील यांनी जाहीर करून टाकलं. त्यांचं वाक्य पूर्ण होत नाही तेच सभागृहात एकच कल्लोळ उडाला होता.

Loading...

===============================================================

स्लॅब कोसळणारा तो थरारक VIRAL VIDEO कुठला ?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2018 11:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...