CCTV : वृद्धाला धडक देऊन रुग्णालयात नेण्याचं नाटक, पुढे जाऊन रस्त्यावरच दिलं टाकून

CCTV : वृद्धाला धडक देऊन रुग्णालयात नेण्याचं नाटक, पुढे जाऊन रस्त्यावरच दिलं टाकून

कोल्हापूरात एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

  • Share this:

संदीप राजगोळकर,

कोल्हापूर, 08 ऑगस्ट : कोल्हापूरात एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका वृद्ध व्यक्तीला एका तरुणाने आपल्या गाडीने धडक दिली नंतर त्याला रुग्णालयात घेऊन जाण्याच नाटक केलं, मग त्यांना पुढे जाऊन रस्त्यावरच टाकून दिलं. हा संतापजनक प्रकार घडलाय कोल्हापूर शहरामध्ये. शंकरराव मोरे असं वृध्द व्यक्तीचं नाव आहे. हा वृद्ध कोल्हापूर शहरातल्या शिवाजी पेठ परिसरातून जात असताना त्यांना एका युवकाच्या गाडीने जोराची धडक दिली. सीसीटीव्हीमध्ये निळा टी-शर्ट घातलेला जो युवक दिसतोय तोच हा युवक आहे.

या धडकेमुळे मोरे यांच्या डोक्याला मार लागला आणि रक्तस्त्राव होऊ लागला त्याचवेळी काही लोक घटनास्थळी जमा झाले. पण त्या तरुणाने त्यांना दवाखान्यात घेऊन जातो असे सांगून एका रिक्षात बसवले पण नंतर पुढे जाऊन त्यांना रुग्णालयात न नेता एका बंद दुकानासमोर सोडून दिले. त्यांच्या खिशातील पैसे आणि ओळखपत्रही काढून घेतले. मग काही लोकांनी पुन्हा विचारणा करताच हे काका बेशुद्ध पडले होते आणि त्यांच्या घरातील व्यक्तींना मी घेऊन येतो असं सांगून त्या तरुणाने तिथून पोबारा केला.

ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून जुना राजवाडा पोलीस या तरुणाचा शोध घेत आहेत. नंतर काही नागरिकांना सुमारे 4 तासांनी हा प्रकार समजल्यावर त्यांनी मोरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र वेळेत उपचार न मिळाल्याने 4 दिवसांनी शंकरराव मोरे यांचा मृत्यू झाला आहे. आता पोलिसांकडून या युवकाचा शोध सुरू आहे. या सगळ्या प्रकारावरून लोकांमध्ये किती माणुसकी आहे हे तुम्हा सगळ्यांना दिसलंच असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2018 01:32 PM IST

ताज्या बातम्या