• होम
  • व्हिडिओ
  • बैलगाडी शर्यतीत आला पहिला, अतिउत्साहात गाडीतून गेला तोल, आणि...! VIDEO
  • बैलगाडी शर्यतीत आला पहिला, अतिउत्साहात गाडीतून गेला तोल, आणि...! VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 28, 2018 10:08 AM IST | Updated On: Aug 28, 2018 10:16 AM IST

    कोल्हापूर, 28 ऑगस्ट : अपघात हा कधी कुठे घडेल हे सांगता येत नाही. कोल्हापूरमध्ये ही असाच एक अपघात घडला आहे. मात्र नशीब बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला. बैलगाडी शर्यतीवर सरकारने बंदी घातली आहे तरीही ग्रामीण भागात बैलगाडी शर्यती आणि घोडा गाडी शर्यतीच आयोजन केलं जातं. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातल्या माद्याळ गावातली ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली पाहून अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. घोडा गाडी शर्यतीमध्ये सगळ्यात पुढे हीच गाडी होती आणि स्पर्धेत पहिला नंबर आला म्हणून या गाडीवानाने चक्क चालत्या बैलगाडीत शड्डू ठोकण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा तोल गेला. मग काय तो थेट रस्त्यावरच पडला त्यानंतर मागून येणारी अनेक वाहने त्याला धडकून पुढे जात होती मात्र ही स्पर्धा पाहणाऱ्या नागरिकांनी वेळीच त्याला रस्त्यावरून बाजूला घेतलं त्याला पाणी पाजलं म्हणून त्याचा जीव वाचला. सध्या ग्रामीण भागामध्ये कुठल्याही कारणावरून अशा स्पर्धांचे आयोजन केलं जातं पण याच स्पर्धा खेळत असताना आयोजकांनी सगळ्यांचीच काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी