दगडफेक, काचेच्या बाटल्या फोडल्या ! कोल्हापुरात 2 गटांत तुफान राडा, नागरिकांमध्ये दहशत

दगडफेक, काचेच्या बाटल्या फोडल्या ! कोल्हापुरात 2 गटांत तुफान राडा, नागरिकांमध्ये दहशत

कोल्हापुरातील सोमवार पेठेत किरकोळ वादावरून दोन गटांत तुफान दगडफेक झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 5 जून : कोल्हापुरातील सोमवार पेठेत किरकोळ वादावरून दोन गटांत तुफान दगडफेक झाल्याचे वृत्त समोर आले आहे. लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून येथे मोठा वाद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत वाहनांचीही तोडफोड केली. या घटनेत पोलिसांसह 10 जण जखमी झाले आहेत. मंगळवारी (4 जून)रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे सध्या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी एकूण 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


तणावाची परिस्थिती पाहता परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

(पाहा :SPECIAL REPORT: पावसाळ्यात मुंबईतील कोणते पूल बंद होणार?)

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी लहान मुलांच्या खेळण्यावर दोन गटात वाद झाला होता.

(पाहा :SPECIAL REPORT : नवरा-बायकोचं भांडणाला हिंसक वळण, दोन गावांनी फोडली एकमेकांची डोकी!)


ज्येष्ठ नागरिकांमुळे हा वाद संपुष्टात देखील आहे. पण याच कारणावरून मंगळवारी पुन्हा वाद उफाळून आला. यानंतर दोन्ही गटांत तुफान दगडफेक, हाणामारी झाली.


परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर शीघ्र कृती दल, एसआरपीएफ या यंत्रणेला पाचारण करण्यात आले. हल्लेखोरांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

VIDEO: किरकोळ कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी, पोलिसांसह 10 जण जखमी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2019 07:32 AM IST

ताज्या बातम्या